पुरस्कार मिळाला यावर विश्वासच बसत नव्हता.निमंत्रण पत्रिका हातात आली, तेव्हा खरं वाटलं. राजभवनात जायचा योग आला. घरच्यांच्या डोळ्यातला आनंद प्रेम पाहून भरून आल्याचं विशाखानं तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. हा पुरस्कार मला माझ्या कामासाठी मिळालाय आणि त्याकरिता काही मंडळी अतिशय महत्वाची आहेत ज्यांच्याशिवाय माझं काम अधुरं राहील असतं. आमची टीम ‘हास्यजत्रा’ सचीन गोस्वामी आणि सचीन मोटे आणि माझा पार्टनर,मित्र, समीर चौगुले आणि प्रसाद खांडेकर आणि नम्रता संभेराव आणि पॅडी कांबळे आणि सोनी मराठी चे मनापासून आभार.’, असंही विशाखानं तिच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे.
विशाखासोबतच आणखी ११ गुणवंत महिलांना पुरस्कार देऊन यावेळी सन्मानित करण्यात आलं. त्यात विशाखा सह बॉलिवुड अभिनेत्री उर्वशी रौतेला, निशिगंधा वाड, कविता राऊत, गायिका पलक मुच्छल यांचा ही समावेश आहे.