हायलाइट्स:
- प्रियांका चोप्राच्या ‘द स्काय इज पिंक’ अभिषेक साकारणार होता आयशाच्या वडिलांची भूमिका
- फरहान अख्तरच्या अगोदर अभिषेक बच्चनला ऑफर करण्यात आली होती त्याची भूमिका
- अभिषेकनं प्रियांकासोबत काम करण्याच्या विरोधात होती ऐश्वर्या राय
राज कुंद्राची एकूण संपत्ती किती? अटकेनंतर Video Viral
रिपोर्टनुसार सोनाली बोसच्या ‘द स्काय इज पिंक’साठी सुरुवातीला अभिषेक बच्चनला प्रियांका चोप्रासोबतच्या भूमिकेसाठी ऑफर देण्यात आली होती. ‘द स्काय इज पिंक’ हा चित्रपट आयशा चौधरीच्या खऱ्या आयुष्यावर आधारित आहे. हा चित्रपट ११ ऑक्टोबर २०१९ रोजी रिलीज झाला होता आणि या चित्रपटात अभिषेकला आयशाच्या वडीलांची भूमिका ऑफर करण्यात आली होती. अर्थात नंतर ही भूमिका फरहान अख्तरनं साकारली तर प्रियांकानं आयशाच्या आईची भूमिका साकारली होती.
‘द स्काय इज पिंक’ जिच्या खऱ्या आयुष्यावर आधारित आहे ती आयशा चौधरी एक मोटिव्हेशन स्पीकर होती. वयाच्या १३ व्या वर्षी पल्मोनरी फ्रायब्रॉयसिसचं निदान झालं होतं. स्वतःच्या आजाराबद्दल आयशाला पूर्ण कल्पना होती. २०१५ साली वयाच्या १८ वर्षी आयशाचं निधन झालं.
राज कुंद्राच्या व्हॉट्सअप चॅटवरून झाले धक्कादायक खुलासे
अभिषेक बच्चनला जेव्हा या भूमिकेची विचारणा झाली होती तेव्हा ऐश्वर्या खूपच गोंधळली होती. कारण या चित्रपटाचा सर्वाधिक भाग हा आई आणि मुलीच्या नात्यावर आधारित होता. ज्यात आईची भूमिका प्रियांका चोप्रानं साकारली होती. तर मुलीच्या भूमिकेत जायरा वसीम दिसली होती. पण चित्रपटात वडिलांची भूमिका फार कमी होती. आपल्या नवऱ्याला एखादी चांगली आणि खंबीर भूमिका मिळावी असं ऐश्वर्याला वाटत होतं. त्यामुळे ऐश्वर्यानं अभिषेकला ही भूमिका न स्वीकारण्याविषयी सुचवलं होतं.