Home ताज्या बातम्या अभोण्यात कांद्याला ६,३१५ रुपये भाव

अभोण्यात कांद्याला ६,३१५ रुपये भाव

0

अभोणा: कळवण बाजार समितीच्या अभोणा उपबाजार आवारात बुधवारी (दि २०) उन्हाळ कांद्यास क्विंटलला सर्वाधिक ६३१५ रु पये भाव मिळाला. आवारात ४० वाहनांद्वारे ६९०० क्विंटल आवक झाली. किमान ४८०० रु पये, कमाल ६३०० तर सरासरी ५७०० रु पये दर मिळाला. गत सप्ताहापेक्षा आज आवक मंदावली. अवकाळी पावसाच्या तडाख्यामुळे यंदा शेती व्यवसायाची उपरिमित हानी झाली आहे. यंदा रांगडा कांद्याचे उत्पादन घटण्याची शक्यता असल्याने डिसेंबर पर्यंत कांद्याचे दर असेच टिकून राहतील. नविन लाल कांदा बाजारात येईपर्यंत कांद्याची लाली अशीच टिकून राहील असा कृषि क्षेत्रातील जाणकारांचा अंदाज आहे.यंदा उन्हाळ कांद्याला चांगला दर मिळाल्याने शेतकऱ्यांनी उन्हाळ कांद्याचे बियाणे खरेदी करून मोठ्या प्रमाणात रोपे टाकली, मात्र परतीच्या पावसामुळे अनेकांच्या शेतातील रोपे वाहून गेली तर काही शेतात सडून गेली. त्यामुळे यंदा उन्हाळ कांद्याच्या उत्पादनात मोठी घट येण्याची शक्यता आहे. उन्हाळ कांद्याची रोपे पावसामुळे खराब झाली आहे. शेतात पावसाचे पाणी साचले होते. त्यामुळे रोपे सडून गेली आहेत. कांद्याची लागवड कमी होऊन उत्पादनात लक्षणीय घट येण्याची शक्यता आहे. जून महिन्यात पावसाळा सुरू झाला त्यावेळी शेतकरी समाधानी झाला होता, पण पीक हातात येण्याची वेळ आणि परतीच्या पावसाची एकच वेळ झाली.