अमरावती शहरात एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू

- Advertisement -

अमरावती : राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहेत. तर दुसरीकडे कोरोनाबाधित मृतांचा आकडाही दिवसेंदिवस वाढत चालला आहे. अमरावतीत कोरोनाचा पहिला बळी गेला आहे. अमरावती शहरात एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. या रुग्णाचा 2 एप्रिलला मृत्यू झाला असून आज सकाळी त्याचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला.

हा रुग्ण एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाला होता. त्याला न्युमोनिया झाल्याचे खासगी डॉक्टरांना सांगितले होते. मात्र रुग्णाला श्वसनक्रियेत अडथळे येत होते. त्यानंतर डॉक्टरांनी त्याला दुसऱ्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र 2 एप्रिल रोजी या रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची तपासणी सुरु आहे. त्यांचेही स्वॅब आणि इतर प्रक्रिया सुरु आहे.

या मृत्यूनंतर अमरावती शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. नागरिकांनी दक्षतेचे पालन करावे. शक्यतो घराबाहेर पडू नये. ताप, खोकला आदी कुठलाही त्रास जाणवत असल्यास तत्काळ तपासणी करून घ्यावी. घाबरून न जाता दक्ष राहावे. आपल्यासह इतरांचीही काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले (Corona Death Amravati) आहे.

कोरोनामुळे महाराष्ट्रात कुठे किती मृत्यू?

  1. मुंबई – 64 वर्षीय वृद्धाचा मृत्यू – 17 मार्च
  2. मुंबई – 63 वर्षीय वृद्धाचा मृत्यू – 22 मार्च
    मुंबई – फिलिपाईन्सच्या 68 वर्षीय वृद्धाचा मृत्यू– 23 मार्च (कोरोना निगेटिव्ह, मृत्यूचं कारण अन्य)*
  3. मुंबई – 65 वर्षीय वृद्धाचा मृत्यू – 23 मार्च
  4. मुंबई – एकाचा मृत्यू -25 मार्च
  5. नवी मुंबई – वाशीतील 65 वर्षीय महिलेचा मृत्यू– 26 मार्च
  6. मुंबई – 63 वर्षीय महिलेचा मृत्यू– 26 मार्च
  7. बुलडाणा – 45 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 28 मार्च
  8. मुंबई – 40 वर्षीय महिलेचा मृत्यू – 28 मार्च
  9. पुणे – 52 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू – 30 मार्च
  10. मुंबई – 80 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू – 30 मार्च
  11. मुंबई – 65 वर्षीय वृद्धाचा मृत्यू – 31 मार्च
  12. पालघर  – 50 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 1 एप्रिल
  13. मुंबई – 51 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 1 एप्रिल
  14. मुंबई – 84 वर्षीय महिलेचा मृत्यू – 1 एप्रिल
  15. मुंबई – 73 वर्षीय महिलेचा मृत्यू – 1 एप्रिल
  16. मुंबई – 63 वर्षीय महिलेचा मृत्यू – 1 एप्रिल
  17. मुंबई – 56 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 1 एप्रिल
  18. जळगाव – एका रुग्णाचा मृत्यू – 2 एप्रिल
  19. मुंबई – 61 वर्षीय महिलेचा मृत्यू – 2 एप्रिल
  20. मुंबई – 58 वर्षीय महिलेचा मृत्यू – 2 एप्रिल
  21. मुंबई – 58 वर्षीय महिलेचा मृत्यू – 2 एप्रिल
  22. मुंबई – 63 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 2 एप्रिल
  23. पुणे : 50 वर्षीय महिलेचा मृत्यू – 2 एप्रिल
  24. वसई – 68 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 2 एप्रिल
  25. बदलापूर – एका रुग्णाचा मृत्यू – 3 एप्रिल
  26. मुंबई – 65 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 3 एप्रिल
  27. मुंबई – 62 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 3 एप्रिल
  28. अमरावती – एका रुग्णाचा मृत्यू – 4 एप्रिल

राज्यात आतापर्यंत 28 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यात सर्वाधिक मृत्यू हे मुंबईतील आहे. मुंबईत कोरोनामुळे आतापर्यंत 20 जणांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे. तर देशात कोरोनाबाधितांचा आकडा 3000 पार गेला आहे. जगात कोरोनामुळे 55 हजार मृत्यू झाले आहेत.

जिल्हारुग्णबरेमृत्यू
मुंबई2781419
पुणे (शहर+ग्रामीण)5192
पिंपरी चिंचवड2010
सांगली25
अहमदनगर201
नागपूर164
कल्याण-डोंबिवली10
नवी मुंबई*161
ठाणे*101
वसई-विरार*81
पनवेल*5
पालघर21
यवतमाळ43
बुलडाणा51
सातारा3
कोल्हापूर2
उल्हासनगर *1
गोंदिया1
औरंगाबाद31
सिंधुदुर्ग1
नाशिक1
रत्नागिरी2
जळगाव11
हिंगोली1
उस्मानाबाद2
अमरावती01
वाशिम1
इतर राज्य (गुजरात)1
एकूण4894128
- Advertisement -