Home गुन्हा अमली पदार्थाची चोरून तस्करी करणारे दोन जण ताब्यात

अमली पदार्थाची चोरून तस्करी करणारे दोन जण ताब्यात

0

पुणे : परवेज शेख अमली पदार्थाची चोरून तस्करी करणारे दोन जण ताब्यात खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार (दिनांक- १५/१०/२०१९ रोजी युनिट.3 गन्हे शाखा पुणे कडील पोलीस अधिकारी व कर्मचारी हे वरिष्ठांचे आदेशानुसार निवडणुक कालावधीत शस्त्र बाळगणारे, शस्त्र विक्री करणारे, तसेच अंमली पदार्थांची चोरुन विक्री करणारे यांची माहीती काढत त्या अनुषंगोन सरकारी वाहनातून कोथरुड पोलीस स्टेशनचे हद्दीत पेट्रोलींग करत असताना चांदणी चौकाजवळील प्रथमेश ईलाईट बिल्डिंग जवळ कोथरुड कटटा हॉटेलसमोर पुणे येथे एक महिला व एक पुरुष असे संशयीतरित्या उभे असलेले दिसले त्याचा हालचाल संशयास्पद दिसुन आल्याने पोलीसांनी त्यांना हटकले त्यावेळी ते घाईघाईने निघुन जावु लागले त्यांनी पोलीस स्टाफच्या मदतीने दुपारी ०१/०० वा चे सुमारास ताब्यात घेतले.

त्यावेळी त्यांनी आपली नाये सेलवम नरेशन देवेंदर वय – ५७ वर्षे रा . प्रतिक्षानगर पाईप लाईन, पंचशिलनगर, सायन कोळीवाडा, मुंबई व महिलेने आपले नाव वासंती चिन देवेंदर वय – ५७ वर्षे रा – सदर असे असल्याचे सांगितले. त्यांची संशयावरुन अंगझडती घेतली त्यावेळी

सेलवम देवेंद्रर याचे ताव्यातील सॅक बॅग मध्ये १ किलो व वासंती देवेंदर हिचेजवळली कापडी पिशवीमध्ये ५४० ग्रॅम ब्राऊन शुगर हा अंमली पदार्थ मिळाला तो जप्त करण्यात आला आहे. त्याची किंमत रुपये ७७,००,०००/- (सत्याहत्तर लाख रुपये फक्त) असुन सदर मालाची आंतरराष्ट्रीय किंमत रुपये १,६०,००,०००/- (एक कोटी साठ लाख रुपये) आहे. वरीलप्रमाणे सदर आरोपीकडे वरील वर्णनाचा व वरील किंमतीचा अंमली पदार्थ मिळाल्याने त्यांचे विरुध्द अंमली पदार्थ विरोधी कायदा कलम ८(क). २२(क). २९ कोथरुड पो.स्टे पुणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी हे मुळचे पंचशील नगर सायन कोळीवाडा मुंबई येथील राहणारे आहेत. त्यांनी अंमली पदार्थ कोठुन व कोणाकडुन आणला आहे तो कोणाला देणार होते ? याबाबत तपास करण्यात येत आहे.

सदरची कामगिरी अपर पोलीस आयुक्त गुन्हे श्री. अशोक मोराळे, पोलीस उप-आयुक्त गुन्हे पुणे श्री. बच्चन सिंग, यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राजेन्द्र मोकाशी, सहा. पोलीस निरीक्षक भालचंद्र ढवळे, पोलीस उप निरीक्षक संजय गायकवाड, किरण अडागळे पोलीस कर्मचारी सचिन गायकवाड, प्रविण तापकिर, संदीप तळेकर, विल्सन डिसोझा, मच्छिंद्र वाळके, राहुल घाडगे, गजानन गानबोटे, रामदास गोणते यांच्या पथकाने केली आहे.