Home शहरे जळगाव अमळनेर धुळे सीमेवरून वाहणाऱ्या पांझरा नदीला महापूर, बोदर्डे ग्रा.पं.ला पाण्याचा वेढा; ५0 कुटुंबांचे स्थलांतर

अमळनेर धुळे सीमेवरून वाहणाऱ्या पांझरा नदीला महापूर, बोदर्डे ग्रा.पं.ला पाण्याचा वेढा; ५0 कुटुंबांचे स्थलांतर

0

अमळनेर : अक्कलपाड़ा धरणातून पाण्याचा विसर्ग वाढला. रविवारी रात्री १२ वाजेच्या सुमारास पांझरा नदीच्या पाण्याने अमळनेर तालुक्यातील मुडी ,बोर्दडे येथील गाव दरवाजाच्या तीन पाय-या बडाल्या व शॉपिंगकॉम्प्लेक्समध्ये पाणी घुसले. तसेच बोदडे ग्रामपंचायतीला पाण्याने वेढा घातला. 
ग्रामपंचायतीचे काही महत्वाचे कागदपत्रे पाण्यात भिजले आहेत, रविवारी रात्री ९.३० वाजता ४० हजार क्युसेक पाणीसोडले. त्यामुळे नदीला महापूर आला आहे. मुडी-कळंबू रस्ता



पाण्याने बुडाला. बोदडे येथील ५० आदिवासी कुटुंबे जि.प. शाळेत स्थलांतरित केले. तसेच मुडी गावाचे बस स्टँड वरचे शॉपिंग मध्ये पाणी घुसल्याने काहींचे नुकसान झाले आहे.
अक्कलपाडा धरणातून रविवारी रात्री पांझरा नदी पात्रात २२,०००क्यूसेस पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे.


हा पाण्याच विसर्ग ४०,००० क्यूसेस पर्यंत जाणारआहे. त्यामुळे पांझरा नदी दुथडी भरून वाहतआहे. .