Home मनोरंजन अमिताभ बच्चनपेक्षा जितेंद्र सरस; रीना रॉय यांचं वक्तव्य ऐकून सर्वजण थक्क

अमिताभ बच्चनपेक्षा जितेंद्र सरस; रीना रॉय यांचं वक्तव्य ऐकून सर्वजण थक्क

0
अमिताभ बच्चनपेक्षा जितेंद्र सरस; रीना रॉय यांचं वक्तव्य ऐकून सर्वजण थक्क

[ad_1]

हायलाइट्स:

  • इंडियन आयडल १२ कार्यक्रमात रीना रॉय आणि बप्पी लहिरी प्रमुख पाहुणे
  • सर्व स्पर्धकांनी रीना रॉय आणि बप्पी लहिरी यांची गाणी गायली
  • रीना रॉय यांनी त्यांच्या काळातील आठवणींना दिला उजाळा

मुंबई : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम इंडियन आयडल १२ मध्ये याआठवड्यात अभिनेत्री रीना रॉय आणि डिस्को किंग बप्पी लहरी पाहुणे म्हणून येणार आहेत. कार्यक्रमातील सर्व स्पर्धखांनी रीन रॉय आणि बप्पी लहरी यांचे जोरदार स्वागत केले आहे. तसेच सर्व स्पर्धकांनी या दोघांची लोकप्रिय गाणी सादर करत त्यांना मानवंदना दिली आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने तब्बल २१ वर्षांच्या प्रदीर कालखंडानंतर रीना रॉय छोट्या पडद्यावर दिसल्या आहेत.


या आठवड्याअखेरीस प्रसारित होणा-या या भागामध्ये दानिश खानने रीन रॉय यांच्यावर चित्रीत केलेले ‘आदमी मुसाफिर है, आता है ताजा है’ हे गाणे गायले. दानिशने गायलेल्या या गाण्यामुळे सगळेजण भारावून गेले होते. रीना रॉय यांना दानिने गायलेले गाणे खूपच आवडले. त्या म्हणाल्या, ‘दानिश तुम्ही अतिशय सुंदर पद्धतीने हे गाणे गायले आहेत. अशाच छान पद्धतीने तुम्ही गात रहा… तुमच्या गाण्यामुळे काही जुन्या आठवणी मनात दाटून आल्या आहेत…’ त्यानंतर रीना यांनी त्यांच्या काही आठवणी उपस्थितांना सांगितल्या. इतकेच नाही तर स्पर्धकांनी गायलेल्या गाण्यांवर रीना रॉय यांनी स्टेजवर मनसोक्त डान्स ही केला…

जितेंद्र अतिशय वक्तशीर आहेत

AssignmentImage-356539132-1627185844

रीना रॉय यांनी या गाण्याच्या आठवणी सांगितल्या. त्या म्हणाल्या, ‘ या गाण्याची चित्रीकरण काश्मीर मध्ये झाले होते. या चित्रीकरणासाठी आम्ही सर्वजण एक महिना तिथे वास्तव्यास होतो. त्यावेळी अनेक क्रू मेंबर्स त्यांच्या लहान मुलांना घेऊन आले होते. काम संपल्यानंतर आम्ही सर्वजण मिळून खेळायचो. खूप मजा, धम्माल करायचो. संध्याकाळी ७.३० वाजेपर्यंत आमचे जेवणही व्हायचे.’ जितेंद्र यांच्या वक्तशीरपणाबद्दल रीना यांनी सांगितले, ‘मी जितेंद्रजींसोबत अनेक सिनेमांत काम केले आहे. दिवंगत ओम प्रकाशजी हे अनेक सिनेमांमध्ये माझे सहकलाकार होते. जितेंद्र हे वेळेच्या बाबत अतिशय सजग असायचे. दिलेल्या वेळेवर ते यायचेच. ते अतिशय वक्तशीर म्हणून प्रसिद्ध होते. त्यांचे इतके वक्तशीर कुणीच नाही अगदी अमिताभ बच्चनही नाही…’

रीना यांनी पुढे सांगितले, ‘मला अजूनही आठवते की आमचे सकाळी चित्रीकरण होते. चित्रीकरणासाठी जीतूजी आम्हाला पहाटे पाच वाजता बोलवायचे. लवकर येऊन आम्ही सर्वजण चित्रीकरणासाठी वेळेत तयार व्हायचो. यामुळे आम्ही ठरलेल्या वेळेच्या आधीच आमचे चित्रीकरण पूर्ण झाले. जीतूजींसोबत काम करण्याचा अनुभव खूपच छान होता. त्यांच्यात असलेला उत्साह, जोश मला प्रचंड आवडायचा. त्यापासून मी आणि अनेक कलाकारांनी प्रेरणा घेतली आहे.’



[ad_2]

Source link