हायलाइट्स:
- कौन बनेगा करोडपती कार्यक्रम ऑगस्टपासून प्रसारित होणार
- अमिताभ बच्चन सूत्रसंचालकाच्या भूमिकेत
- करोनामुळे कार्यक्रमाच्या स्वरुपात काही बदल
करोनामुळे कार्यक्रमात काही बदल
करोनामुळे कौन बनेगा करोडपती कार्यक्रमाच्या स्वरुपामध्ये काही बदल करण्यात आले आहेत. लाईफलाईनमधून ऑडियन्स पोल काढून टाकला आहे. हे पर्व देखील इतर पर्वांसारखे अधिक मनोरंजक करण्यासाठी निर्माते प्रयत्न करत आहेत. १० मे पासून या कार्यक्रमातील सहभागासाठी नोंदणी प्रक्रिया सुरू केली होती. त्यामध्ये अमिताभ बच्चन यांनी अनेक प्रश्न विचारले होते.
असा होता १२ वर्षांचा प्रवास
कौन बनेगा करोडपती कार्यक्रमाचा पहिले पर्व २००० मध्ये प्रसारित झाले होते. त्यावेळी यात सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना चार पर्याय दिले जायचे. स्पर्धकांनी सगळ्या प्रश्नांची अचूक उत्तरे दिली तर त्याला १ कोटी रुपयांचे बक्षिस दिले जायचे. हा कार्यक्रम सुरू झाला तेव्हापासून अमिताभ बच्चन हेच सूत्रसंचालकाच्या रूपात आहेत.
केवळ तिसऱ्या पर्वामध्ये अमिताभ ऐवजी शाहरुख खानने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले होते. परंतु प्रेक्षकांना बिग बींची खूपच उणीव भासली होती. त्यामुळे त्या पर्वाची लोकप्रियता कमी होती. त्यानंतर कार्यक्राचे निर्माता सिद्धार्थ बासू यांनी सांगितले की, ज्या गोष्टी अमिताभ यांच्यासाठी योग्य होत्या त्या शाहरुखबरोबर योग्य ठरल्या नाहीत. शाहरुखने देखील या कार्यक्रमात मनोरंजन आणण्याचा त्याच्यापरीने प्रयत्न केला होता. अर्थात अमिताभ बच्चन यांची तुलना कुणाशीच होऊ शकत नाही. त्यांची जागा घेणे ही गोष्ट नक्की मोठी आहे.
आता कौन बनेगा करोडपती १३ मध्ये सूत्रसंचालक म्हणून अमिताभ बच्चनच असणार आहेत. दरम्यान, अमिताभ बच्चन यांच्या कामासंदर्भात सांगायचे तर आजही त्यांच्याकडे अनेक सिनेमे आहेत. सगळ्या महत्त्वाचा सिनेमा ‘चेहरे’ या सिनेमात त्यांच्यासोबत इम्रान हाश्मी आहे. याशिवाय ते झुंड, मेडे आणि ब्रह्मास्त्र सिनेमातही दिसणार आहेत.