Home शहरे मुंबई अमित शहा-मुख्यमंत्र्यांनी घेतला बाप्पाचा आशीर्वाद

अमित शहा-मुख्यमंत्र्यांनी घेतला बाप्पाचा आशीर्वाद

0

मूंबई : गणेश चतुर्थीनिमित्त अनेकांच्या घरी गणरायाचे आगमन झाले आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही वर्षा निवासस्थानी गणपतीची प्राणप्रतिष्ठा केली. सपत्नीक त्यांनी गणपती बाप्पाची पूजा केली. मूंबई दौऱ्यावर असलेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गणेशोत्सवानिमित्त प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिर व लालबागच्या राजाला भेट देत बाप्पाचा आशीर्वाद घेतला.