Home बातम्या आंतरराष्ट्रीय अमेरिकेने आखला 18 कलमी कार्यक्रम,भारतच्या मदतीने चीनला धडा शिकवणार

अमेरिकेने आखला 18 कलमी कार्यक्रम,भारतच्या मदतीने चीनला धडा शिकवणार

अंतरराष्ट्रीय : अमेरिकेचा चीनवरील रोष हा दिवसेंदिवस वाढतचं आहे. तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे चीनवरील राग सतत बोलून दाखवत आहेत. चीनने व्हायरस सुरूवातीच्या टप्प्यात असतानाच जगाला या संदर्भात माहिती न दिल्याने दुष्परिणामांना सामोरे जावे लागत आहे, असे डोनाल्ड ट्राम्प वारंवार बोलत आहेत. यावर आता नवीन माहिती समोर आली आहे.

अमेरिका भारताची मदत घेऊन चीनला धडा शिकवणार आहे. यासाठी अमेरिकेने 18 कलमी कार्यक्रमही आखला आहे. याबाबत एका वरिष्ठ अमेरिकन सीनेटरने माहिती दिली. सीनेटर थॉम टिलिस म्हणाले की, चीनने कोरोना व्हायरस पसरवला आहे, ज्याद्वारे लाखो अमेरिकन ग्रस्त झाले. अमेरिकन लोकांच्या आरोग्याची रक्षा आणि अर्थव्यवस्थेच्या नुकसान भरपाईसाठी चीनवर निर्बंध लावण्यात यावेत.

मित्र देशांबरोबर सैन्य सहकार्य वाढविण्यासाठी पॅसिफिक डिटरेंस इनिशिएटिव्ह नावाच्या एका कार्यक्रमाची सुरूवात करण्याची मागणी करण्यात आली आहे. ज्यात सैन्याच्या सामानासाठी 20 बिलियन डॉलर्सचा निधी देखील अमेरिकाच देईल. या योजनेद्वारे प्रादेशिक मित्रपक्षांसह सैन्य संबंध मजबूत होतील. याशिवाय सीनेटरने भारत, तायवान आणि व्हिएतनामला स्टेट ऑफ द आर्ट सैन्य उपकरणांच्या विक्रीसाठी मंजूरी देण्याची मागणी केली आहे.

चीनचे आर्थिक नुकसान करणार

यावेळी सीनेटर थॉम टिलिस यांनी चीनला आर्थिक फटका बसावा यासाठी चीनमधील सर्व अमेरिकन उत्पादन कंपन्यांना देशात परत आणण्यात येणार असल्याचे सांगितले. तर सीनेटर ट्रम्प यांना आवाहन करत म्हणाले की, दुसऱ्या मित्र देशांना देखील चीनवर असेच निर्बंध लादण्यास सांगावे. ज्याद्वारे चीनला त्याची शिक्षा मिळेल. आपण मिळून चीनी हॅकर्सला देखील रोखू आणि आपली सायबर सुरक्षा देखील मजबूत करू.

दरम्यान चीननेमध्ये सुरवात झालेल्या कोरोनाने बघता बघता अख्या जगाला आपल्या कवेत घेतले आहे. तर याचा सर्वाधिक फटका अमेरिका आणि युरोपियन देशाला बसला आहे. अमेरिकेत सध्या 14 लाख 57 हजार 593 एवढे जण कोरोनाबाधित आहेत. तर आतापर्यंत 86 हजार 912 एवढ्या जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या जगात 45 लाख 40 हजार 244 जण कोरोनाबाधित आहेत.