हायलाइट्स:
- ‘इंडियन आयडल १२’ मध्ये साजरा होतोय फादर्स दे
- अरुणिताने वडिलांना दिली खास भेट
- मुलीने दिलेली भेट पाहून अरुणिताचे वडील भावुक
ज्युरी म्हणण्यापेक्षा ताई दादाच्या भूमिकेत असणार आहोत: आर्या आंबेकर
वाहिनीद्वारे प्रदर्शित झालेल्या प्रोमोमध्ये दाखवण्यात आल्याप्रमाणे, अरुणिता गाणं संपल्यानंतर आपल्या वडिलांबद्दल बोलताना म्हणते, ‘माझे वडील सगळ्यांच्या सुखांचा सगळ्यात आधी विचार करतात. माझी स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी नेहमीच मला मदत केली. माझ्यासाठी ते माझी सपोर्ट सिस्टीम आहेत.’ असं म्हणत अरुणिता आपल्या वडिलांच्या हातावर चक्क लंडन प्रवासाचं तिकीट ठेवते. ही खास भेट पाहून अरुणिताचे वडीलदेखील भावुक होतात. अरुणितासारखी मुलगी मिळणं हे त्यांचं भाग्य असल्याची भावना ते व्यक्त करतात.
वडिलांना लंडनला पाठ्वण्याबद्दल अरुणिता म्हणते, ‘माझे वडील नेहमी लंडन प्रवासाची स्वप्न बघायचे, पण आमची परिस्थिती फार बरी नसल्यामुळे त्यांचं स्वप्न कायम स्वप्नच राहिलं. त्यांनी प्रत्येक अडचणीत मला सावरलंय. मी त्यांना लंडनला जाण्याचं तिकीट देताना त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद होता तो माझ्यासाठी लाखमोलाचा आहे. मी त्यांची मुलगी आहे म्हणून मी स्वतःला नशीबवान समजते.’ यासोबतच अरुणिताप्रमाणे पवनदीपचे वडीलदेखील कार्यक्रमात हजेरी लावणार आहेत. त्यांना पाहून पवनदीपही भावुक होतो आणि त्यांना घट्ट मिठी मारतो.
वडिलांकडून झालेल्या फसवणुकीनंतर आईने… ; नीना गुप्ता यांचा आणखी एक मोठा खुलासा

























WhatsApp