हायलाइट्स:
- रियाने सोशल मीडियावर केली मदतीची मागणी
- पोस्ट करताच नेटकऱ्यांनी साधला रियावर निशाणा
- नेटकऱ्यांनी रियाला दिला खोटं वागणं बंद करण्याचा सल्ला
रणवीर सिंगचे अतरंगी फोटोशूट, फोटो पाहून डोक्याला लावाल हात
रियाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात ती एका चिमुकल्या मुलाचा जीव वाचवण्यासाठी चाहत्यांना पैशांची मदत करण्याचं आवाहन करतेय. रियाने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये मुलाला गंभीर स्वरूपाचा आजार आहे. या आजारावर एक खास औषध उपलब्ध आहे. परंतु, त्या औषधाची किंमत तब्बल १६ कोटी रुपय् इतकी आहे. आपल्या पोस्टद्वारे रियाने या मुलाचा जीव वाचवण्यासाठी नेटकऱ्यांकडे पैसे दान करण्याची मागणी केली आहे. परंतु, रियाची ही पोस्ट नेटकऱ्यांना खास पसंत पडली नसावी. नेटकऱ्यांनी रियाला या पोस्टवरही ट्रोल केलं आहे.
सुशांतच्या मृत्यूसाठी रियाला जबाबदार धरणाऱ्या नेटकऱ्यांनी पुन्हा एकदा रियावर निशाणा साधला आहे. रियाच्या पोस्टवर उत्तर देत एका युझरने म्हटलं, ‘तू कर त्याची मदत, तुझ्याकडे तर खूप पैसे आहेत.’ तर काही नेटकऱ्यांनी रिया लोकांची सहानुभूती मिळवण्यासाठी हे सगळं करत असल्याचं म्हटलं. काही नेटकऱ्यांनी रिया मुलाचा वापर करून तिची चाहत्यांमधील प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न करत असल्याचं देखील म्हटलं. काहींनी म्हटलं, ‘खोटा चांगुलपणा दाखवून आता काहीही उपयोग नाही. सहानुभूती मिळवण्याची ही पद्धत आता जुनी झाली आहे.’ काही नेटकऱ्यांनी रियाला नाटकी म्हटलं. सुशांतच्या मृत्यूनंतर अंमली पदार्थांच्या प्रकरणात रियाला तुरुंगातही जावं लागलं होतं. आता रिया जामिनावर बाहेर आहे.
कणखर मंदिरानं बजावला पत्नीधर्म, पतीच्या पार्थिवाला दिला खांदा