संध्या जयराज, रवी आणि वीरेश अशी चाहत्यांची ओळख पटली आहे. ट्विटर यूजर विष्णूने राम आणि चाहत्यांच्या भेटीची काही फोटो सोशल मीडियावर शेअरकेले आहेत. या फोटोंमध्ये राम एका चाहत्याला आत्मियतेने मिठी मारताना आणि त्याच्याशी बोलताना दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोत रामने तिघांसोबत एकत्रित फोटो काढला..
ट्विटर युजर म्हणाला- अभिनेत्याने मिठी मारली
हे फोटो शेअर करताना एका ट्विटर युजरने लिहिले की, ‘मेगापावर स्टार राम चरणने सुमारे २३१ किमी चालत आलेल्या चाहत्यांची भेट घेतली. त्यांना मिठी मारली आणि त्यांच्याशी आदराने बोलत थोडा वेळ घालवला.’
राम चरण ‘आरआरआर‘मध्ये दिसणार आहे
काही दिवसांपूर्वीच राम चरण ला ‘आरआरआर’ चित्रपटाच्या सेटवर प्रख्यात हेअरस्टाइलिस्ट अलिम हकीम याच्यासोबत पाहण्यात आले होते. या सिनेमाचे दिग्दर्शन एस.एस. राजामौली करत आहेत आणि ज्युनिअर एनटीआर, आलिया भट्ट, अजय देवगण यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.