हायलाइट्स:
- अभिनेत्री दीपिका पादुकोण सोशल मीडियावर नेहमीच असते चर्चेत
- दीपिका पादुकोणनं शेअर केलेला व्हिडिओ पाहून चाहते गोंधळले
- सोशल मीडियावर व्हायरल होतोय दीपिकाचा नवा व्हिडिओ
दीपिका पादुकोणचा नवीन व्हिडीओ पाहून तिच्या चाहत्यांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. अनेक युझर्सनी हा व्हिडिओ पाहून कमेंटमध्ये प्रश्न विचारायला सुरुवात केली आहे. एका युझरनं दीपिकाच्या या व्हिडिओवर कमेंट करताना लिहिलं, ‘अरे हे नक्की आहे तरी काय? काहीच समजलं नाही.’ तर दुसऱ्या एका युझरनं लिहिलं, ‘हे काय होतं? आणि का होतं?’ अर्थात दीपिकाला या भीतीदायक रुपात पाहणं देखील मजेदार आहे. एकीकडे दीपिकाचा हा अवतार पाहून चाहते गोंधळले आहेत. तर दुसरीकडे काही चाहत्यांमध्ये, आगामी काळात दीपिका एखाद्या हॉरर चित्रपटात दिसणार की काय अशा चर्चा रंगल्या आहेत.
दीपिकाचा हा व्हिडिओ पाहिल्यावर हे सांगणं कठीण आहे की, या व्हिडिओतून ती चाहत्यांना नेमकं काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे. या व्हिडीओमध्ये दीपिका एका भीतीदायक पेंटिंगमध्ये फसलेली दिसत आहे. ज्यात ती एका वेगळ्याच कॅरॅक्टरमध्ये दिसत आहे. तसेच व्हिडिओच्या बॅकग्राउंडला भीतीदायक म्यूझिक सुरु आहे. हा व्हिडीओ शेअर करताना दीपिकानं कॅप्शनमध्ये भूताचा इमोजी पोस्ट केला आहे.
दीपिकाच्या कामाबद्दल बोलायचं तर तिनं काही दिवसांपूर्वीच दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभाससोबत तिच्या आगामी चित्रपटाच्या पहिल्या क्लॅपचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो पोस्ट करताना तिनं लिहिलं, ‘प्रोजेक्ट- K चा पहिला दिवस आहे. पुढे जे काही होणार आहे त्यासाठी मी खूपच उत्सुक आहे.’