Home मनोरंजन अर्जुन रामपालच्या विचित्र हेअरस्टाइल मागे आहे खास कारण, खुलासा करत म्हणाला…

अर्जुन रामपालच्या विचित्र हेअरस्टाइल मागे आहे खास कारण, खुलासा करत म्हणाला…

0
अर्जुन रामपालच्या  विचित्र हेअरस्टाइल मागे आहे खास कारण, खुलासा करत म्हणाला…

[ad_1]

हायलाइट्स:

  • अर्जुनच्या केसांना रंगवण्यामागे आहे खास कारण
  • इन्स्टाग्रामवर पोस्ट करत केला खुलासा
  • चित्रपटासाठी अर्जुनने बदलला आपला लुक

मुंबई– बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. अर्जुनच्या नव्या हेअरस्टाइलने सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. अर्जुनच्या नव्या हेअरस्टाइलचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड वेगाने वायरल झाले. अर्जुनने त्याच्या केसांना प्लॅटिनम ब्लॉन्ड रंगाने रंगवलं आहे. या लूकमध्ये अर्जुन अगदीच हटके दिसत आहे. अर्जुनच्या चाहत्यांनी त्याच्या नव्या लूकचं तोंडभरून कौतुक केलं तर काहींनी त्याला विचित्र हेअरस्टाइल का करून आला आहेस, असे प्रश्न विचारले. अखेर अर्जुनने चाहत्यांच्या या प्रश्नांना उत्तर दिलं आहे.

काम न मिळाल्यामुळे ‘सावधान इंडिया’ फेम अभिनेत्रींनी केली चोरी

अर्जुनने मॉडेलिंग केल्यानंतर बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. अर्जुन नेहमीच त्याच्या केसांसोबत निरनिराळे प्रयोग करताना दिसतो. कधीकाळी अर्जुनच्या लांब केसांवर मुली फिदा होत असत. त्यानंतर अचानक अर्जुनने त्याचे केस छोटे केले होते. आपल्या नव्या हेअरस्टाइलचा फोटो अर्जुनने इन्स्टाग्रामवर देखील शेअर केला आहे. त्यासोबतच त्याने आपल्या केसांवर प्रयोग करण्याचं कारणही सांगितलं आहे. अर्जुनने लिहिलं, ‘चित्रपटामधला एक असा भाग ज्याने मला स्वतःमध्ये बदल करण्यासाठी भाग पाडलं.’ त्यासोबतच अर्जुनने त्याच्या हेअरस्टायलिशला धन्यवाद दिले आहेत.


या पोस्टमध्ये अर्जुन ज्या चित्रटाबद्दल बोलत आहे तो चित्रपट म्हणजे ‘धाकड‘. ‘धाकड’ चित्रपटात अर्जुन नकारात्मक भूमिका साकारत आहे. त्याच्या भूमिकेला न्याय देण्यासाठी आणि पात्राची गरज म्हणून अर्जुनने आपल्या लूकमध्ये बदल केला आहे. ‘धाकड’ चित्रपटात अर्जुनच्या सोबत अभिनेत्री कंगना रणौत मुख्य भूमिकेत आहे. १ ऑक्टोबर रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘नेल पॉलिश’ नंतर हा चित्रपट अर्जुनसाठी महत्वपूर्ण ठरणार आहे. चित्रपटासाठी अर्जुनने स्वतःमध्ये केलेल्या या बदलामुळे प्रेक्षकांमध्ये चित्रपटाची उत्सुकता आणखीनच वाढली आहे.

‘इतकी लोकप्रियता मिळूनही तुला गर्व नाही’, ‘देवमाणूस’चं कौतुक



[ad_2]

Source link