Home ताज्या बातम्या अर्थसंकल्पापूर्वीच शेअर बाजारात निराशा, सेन्सेक्स 200 अंकांनी कोसळला

अर्थसंकल्पापूर्वीच शेअर बाजारात निराशा, सेन्सेक्स 200 अंकांनी कोसळला

0

 थोड्याच वेळात देशाचे सर्वसाधारण बजेट सादर केले जाणार आहे. आर्थिक मंदीच्या काळात सादर केलेले हे बजेट अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. या अर्थसंकल्पापूर्वी भारतीय शेअर बाजारामध्ये निराशेचे वातावरण आहे. सुरुवातीच्या व्यापारात सेन्सेक्स 200 अंकांपेक्षा जास्त खाली आला तर निफ्टी 130 अंकांनी खाली येऊन 11 हजार 900 च्या खाली आला.

सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर होणार असल्याने साप्ताहिक सुट्टी म्हणजेच शनिवारीसुद्धा शेअर बाजाराचे कामकाज होत आहे. तथापि, बजेटनिमित्त शनिवारी देशांतर्गत शेअर बाजार शनिवारी प्रथमच उघडलेले नाहीत. तत्पूर्वी, माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी शनिवारी, 28 फेब्रुवारी 2015 रोजी अर्थसंकल्प सादर केला आणि त्यादिवशी बाजारातही व्यापार होता.

आठवड्याच्या पहिल्या दोन व्यापार दिवस-सोमवार आणि मंगळवार सेन्सेक्स 645 अंकांवर घसरला. दुसरीकडे, निफ्टी सुमारे 194 अंकांनी घसरला आहे.तर बुधवारी सेन्सेक्स 231.80 अंकांनी वधारून 41,198.66 व निफ्टी 73.70 अंकांनी वधारून 12,129.50 वर बंद झाला.