नवी दिल्ली : संसदेत सादर होणाऱ्या आगामी केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी देशातील आघाडीचे उद्योजक आणि अर्थतज्ज्ञांची भेट घेतली.
अर्थव्यवस्थेला चालना देण्यावर आणि रोजगारांच्या निर्मितीवर लक्ष्य केंद्रीत करण्याचा सल्ला उद्योजकांनी मोदींना दिला.
सरकारने महसूलीची तूट किंवा महागाईची चिंता न करता केवळ अर्थव्यवस्थेच्या विकासावर भर द्यावा, असाही सल्ला मोदींना देण्यात आला.
बैठकीत रोजगार, कृषी, शिक्षण आणि आरोग्या या महत्वपूर्ण विषयांवर चर्चा झाल्याचं समजतंय. यावेळी मोदींना आपले सरकार अर्थिक सुधारणांसाठी कटीबद्ध असल्याचं सांगितलं.
- Advertisement -