हायलाइट्स:
- सोशल मीडियावर सातत्यानं आहे चर्चेत आहे अर्शी खान
- लवकरच अर्शी खान स्वयंवर शोमधून येणार प्रेक्षकांच्या भेटीला
- सलमान खाननं आपल्यासाठी नवरा शोधावा अशी अर्शी खानची आहे इच्छा
अर्शी खान लवकरच तिच्या स्वयंवर शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या शोमध्ये ती कोणाला आपला नवरा म्हणून निवडायचं आहे आणि कोणाला नाही हे ती स्वतः ठरवणार आहे. या शोबद्दल बोलताना अर्शी खान म्हणाली, ‘मला वाटतं सलमान सरांनी नवरा शोधण्यासाठी मदत करायला हवी. ते एकटेच आहेत ज्यांनी मला माझ्या करिअरमध्ये पुढे जाण्यास आणि यशस्वी होण्यास मदत केली आहे. बिग बॉसच्या घरानं मला आयुष्यभरासाठी शिकवण दिली आहे.’
अर्शी खान पुढे सांगितलं की स्वयंवरनंतर ती ओटीटी प्लॅटफॉर्मसाठीही काम करणार आहे. सध्या तिच्याकडे बऱ्याच ऑफर असल्याचंही तिनं सांगितलं. अर्शी खान सध्या तिच्या स्वयंवर शोमध्ये बिझी असल्यानं कोणत्याही ऑफर स्वीकारता येत नसल्याचं ती म्हणाली. पण यासोबतच या शोचं शूटिंग संपल्यानंतर पुन्हा एकदा अभिनयाच्या दुनियेत कमबॅक करणार असल्याचं तिनं सांगितलं.
अभिनय आणि मॉडेलिंग करण्याआधी अर्शी खान एक फिजियोथेरपिस्ट म्हणून काम करत होतं. याआधी तिनं एका तमिळ चित्रपटात काम केलं आहे. याशिवाय तिनं ‘सावित्री देवी कॉलेज अँड हॉस्पिटल’ आणि ‘विश’ या टीव्ही मालिकांमध्ये काम केलं आहे.