Home गुन्हा अलंकार, कोथरूड पो.स्टे. परिसरात दहशत पसरविणा-या अट्टल गुन्हेगारास स्थानबद्ध केले आहे

अलंकार, कोथरूड पो.स्टे. परिसरात दहशत पसरविणा-या अट्टल गुन्हेगारास स्थानबद्ध केले आहे

0

अलंकार, कोथरूड पो.स्टे. परिसरात दहशत पसरविणा-या अट्टल गुन्हेगारावर एम.पी.डी.ए.कायदयाचये स्थानबध्दतेची कारवाई

पुणे : परवेज शेख अलंकार व कोथरूड पोलीस स्टेशनचे हद्दीत राहणारा गुन्हेगार इसम नरेंद्र ऊर्फ छोटया महादेव बलकवडे, वय २८ वर्षे, रा.२१७/७/, गणेशनगर, सात चाळ, मेंहेबळे गॅरेजसमोर, एरंडवणे, पुणे हा अभिलेखावरील सराईत गुन्हे करणारा गुन्हेगार आहे. त्याने त्याचे साथीदारांसह अलंकार व कोथरूड पोलीस ठाणे हद्दीमध्ये कोयता, लोखंडी बार, लाकडी काठी, चाकू यासारखी जीवघेणी हत्यारे बाळगुन विनयभंग, फौजदारीपात्र बलप्रयोग, दुखापत, दंगा यासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे केले आहेत. त्याची गुन्हेगारी कृत्ये सन २०११ पासून चालू आहेत. त्याचेविरूध्द ०७ गुन्हे दाखल आहेत. त्याचेविरुध्द प्रतिबंधक कारवाई करण्यात येवून सुध्दा त्याचे गुन्हेगारी कृत्यावर काहीएक परिणाम होत नसलेचे दिसून आले होते. त्याच्या गुन्हेगारी कृत्यं मुळे सदर परीसरातील सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झालेली होती. तसेच त्याच्यापासून व मालमत्तेचे नुकसान होईल या भितीमुळे नागरिक उघडपणे तक्रार करणेस धजावत नव्हत.

पोलीस निरीक्षक गुन्हे श्री. सुनिल तटकरे, नेमणूक अलंकार पो. स्टे, यांनी एमपीडीए कायदयान्वये नमुद इसमास स्थानबध्द करण्याकामी प्रस्ताव तयार करुन मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर यांचेकडे सादर केला होता. डा के व्यंकटेशम पोलीस आयुक्त, पुणे शहर यांनी प्रस्तावाची पडताळणी करुन नमुद इसमाचेविरुध्द दिनांक ०४/०५/२०१९ रोजी एमपीडीए कायदयान्वये एक वर्षाकरीता स्थानबध्दचे आदेश पारीत केले आहेत. त्यानुसार त्यास येरवडा मध्यवर्ती कारागृह, पुणे येथे स्थानबध्द करुन ठेवण्यात आले आहे,

डॉ.के.व्यंकटेशम, पोलीस आयुक्त, पुणे शहर यांनी सक्रीय व दहशत निर्माण करणा-या अट्टल गुन्हेगारांवर कडक प्रतिबंधक कारवाई करण्याचे धोरण अवलंबिले असुन त्यानुसार सन २०१९ सालात १४ गुन्हेगारांना एमपीडीए कायद्यान्वये स्थानबध्द केले असून चालु सालात देखील सदरचे घोरण पुढे चालू ठेवून अशा गुन्हेगारांचेविरूद्ध एमपीडीए अन्वये स्थानबध्दतेची कारवाई करण्यात येणार आहे.