अलिबाग – पोलीस मुख्यालयातील अधिकारी विश्रामगृहात गळफास घेऊन आत्महत्या

- Advertisement -

अलिबाग : प्रतिनिधी

अलिबाग येथे तीन महिन्यांपूर्वी बदलीवर आलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत कणेरकर (50) यांनी पोलीस मुख्यालयातील अधिकारी विश्रामगृहात शुक्रवारी (दि.१६) गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. या घटनेने जिल्हा पोलीस दल हादरुन गेले आहे.

प्रशांत कणेरकर हे तीन महिन्यांपूर्वी मुंबई येथून अलिबाग येथील अर्ज शाखेत रुज झाले होते. अलिबाग येथे अर्ज शाखेत रुजू झाल्यानंतर काही दिवस ते रजेवर गेले होते. त्यानंतर 15 ऑगस्ट रोजी पुन्हा कामावर रुजू झाले होते.  16 ऑगस्ट रोजी पोलीस मुख्यालयातील अधिकारी विश्रामगृहात रात्री आठ वाजण्याच्या सुमारास प्रशांत कणेरकर यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली.

याची माहिती कळताच अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ, पोलीस उपविभागीय अधिकारी सोनाली कदम, अलिबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पी डी. कोल्हे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. पोलिसांनी पंचनामा करून कणेरकर यांचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला. मात्र प्रशांत कणेरकर यांनी आत्महत्या का केली ? याचे कारण स्पष्ट झालेले नाही.

- Advertisement -