Home गुन्हा अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला केले गजाआड

अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला केले गजाआड

0

अल्पवयीन मुलीवर बलात्कार पोलिसांनी आरोपीला तात्काळ केले गजाआड मुलगी पाच महिन्याची गर्भवती

उस्मानाबाद, प्रतिनिधी : तालुक्यातील भोळसर अल्पवयीन मुलगी गरोदर असल्याचे लक्षात आल्याने गावातीलच एकाने हे कृत्य केल्याचे उघड झाले. मुलीच्या फिर्यादीवरून पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. आरोपी (अंदाजे वय ४२) यास अटक करण्यात आली आहे.

एका तालुक्यातील ग्रामीण भागातील गरीब घरची एक वेडसर मुलगी शेळ्या राखते. तिचे वडीलही वेडसर असल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे. तिची आईही वारली आहे.

मागील कांही महिन्यापासून आरोपी पीडित अल्पवयीन मुलीवर सातत्याने लैगिंक अत्याचार करत होता. त्यातून ती गर्भवती राहिली आहे. ही बाब उघड झाल्यानंतर नातेवाईकांनी (ता. उस्मानाबाद) पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याची दखल घेऊन पोलिसांनी आरोपीला तात्काळ गजाआड केले आहे.

या प्रकरणी बाल लैगिक अत्याचार संरक्षण कायदा (पोस्को), अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा (अट्रोसिटी) आणि अन्य कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.