अल्पसंख्यांक विकास विभागाच्या सुधारित अनुदान योजनेसाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन – महासंवाद

अल्पसंख्यांक विकास विभागाच्या सुधारित अनुदान योजनेसाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन – महासंवाद
- Advertisement -




अल्पसंख्यांक विकास विभागाच्या सुधारित अनुदान योजनेसाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन – महासंवाद

मुंबई दि. १८ :-अल्पसंख्याक विकास विभागाकडून अल्पसंख्याक बहुल शासनमान्यता प्राप्त खासगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नगरपरिषद/ नगरपालिका शाळा व अपंग शाळांमध्ये पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी सुधारीत अनुदान योजना सन २०२४-२५ साठी राबविण्यात येत आहे. अनुदान मिळवू इच्छिणा-या संस्थांनी २२ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन विभागाने केले आहे.

विहित अटी व शर्तीची पूर्तता करुन सन २०२४-२५ या आर्थिक वर्षाकरिता विहित नमुन्यातील अर्जासह परिपूर्ण प्रस्ताव, जिल्हाधिकारी, मुंबई शहर, जुने जकात घर, शहीद भगतसिंग मार्ग, फोर्ट, मुंबई- ४००००१ यांचेकडे सादर करावा. विहित अर्जाचा नमुना व योजनेबाबतची अधिक माहिती https://mdd.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. इच्छुक शाळांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव सादर करण्याचा अंतिम दि. २२ फेब्रुवारी, २०२५ आहे. यानंतर प्राप्त होणारे प्रस्ताव स्वीकारले जाणार नाहीत, असे जिल्हा नियोजन समिती, मुंबई शहर जिल्हा यांनी कळविले आहे.

 

0000







- Advertisement -