Home ताज्या बातम्या अवघ्या काही तासांत परदेशी यांचा राजीनामा

अवघ्या काही तासांत परदेशी यांचा राजीनामा

0
अवघ्या काही तासांत परदेशी यांचा राजीनामा

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेले आणि माजी मुख्यमंत्री यांच्या जवळचे अधिकारी अशी ओळख असलेले सनदी अधिकारी यांच्याकडे ठाकरे सरकारने बुधवारी मराठी भाषा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव या कमी महत्त्वाच्या मानल्या गेलेल्या पदाची जबाबदारी दिली होती. मात्र अवघ्या काही तासांतच परदेशी यांनी या पदाचा राजीनामा दिला आहे. एवढेच नव्हे तर राष्ट्रीय क्षमता निर्माण आयोगाचे (एनसीबीसी) सदस्य म्हणून ते गुरुवारी केंद्राच्या प्रशासनात रुजू देखील झाले आहेत.

माजी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या काळात परदेशी यांनी मुख्यमंत्री कार्यालय, वन, पर्यावरण, अर्थ, नगरविकास व महसूल अशा विविध विभागांत जबाबदारी सांभाळली होती. परदेशी यांच्याकडे मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदाची देखील जबाबदारी होती, मात्र महाविकास आघाडी सरकारने परदेशी यांना मुंबई महापालिका आयुक्तपदावरून तडकाफडकी हटविले होते. मुंबईतील करोना रुग्णसंख्या आटोक्यात येत नसल्याने ही कारवाई केल्याचे नंतर सांगण्यात आले होते. प्रवीण परदेशी यांची त्यावेळी नगरविकास विभागात अतिरिक्त मुख्य सचिवपदी बदली करण्यात आली होती. त्यानंतर परदेशी राज्याच्या मुख्य सचिवपदाच्या शर्यतीत उतरले होते, मात्र राज्य सरकारने तिथेही त्यांनी संधी नाकारली होती.

परदेशी गेल्या काही महिन्यांपासून नियुक्तीच्या प्रतीक्षेत असताना बुधवारी राज्य सरकारने सात अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. त्यात प्रवीण परदेशी यांच्याकडे मराठी भाषा विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. या पदावर काम करणे योग्य नसल्याने परदेशी यांनी अवघ्या काही तासांतच राजीनामा देऊन, केंद्रात जाणे पसंत केल्याचे पुढे आले आहे. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय क्षमता निर्माण आयोगाचे सदस्य म्हणून ते प्रशासनात रुजू झाले आहेत.

Source link