सध्या कोरोना (कोव्हीड-19) विषाणू प्रादुर्भावावर नियंत्रण आणण्याकरीता घोषित केलेल्या संचार बंदी काळात बिअर शॉप, वाईन शॉप परमिट रुम इत्यादींना सर्व प्रकारचे दारु विक्रीवर शासनाने निर्बंध घातले आहेत. तसेच रायगड जिल्हयातील सर्व परवाना धारक मद्य विक्रीचे व्यवसाय बंद करणे बाबत आदेश पारित केले आहेत. तथापि काही समाज विघातक घटक सदर आदेशांची पायमल्ली करुन अवैधरित्या छुप्या पध्दतीने मद्यविक्री करीत असल्याची गोपनिय माहिती मिळत होती. त्यामुळे अशा प्रकारे छुप्या पध्दतीने सुरु असलेल्या अवैध धंद्यांवर
कारवाई करणेचे आदेश मा.श्री.अनिल पारस्कर पोलीस अधीक्षक रायगड यांनी सर्व पोलीस ठाणे यांना दिले होते. त्या अनुषंगाने खालील प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.
कोलाड पोलीस ठाणे हद्दीत:- दिनांक 19/04/2020 रोजी 23.50 वा. सुमारास मौजे पुगाव गावाच्या हद्दीत एकूण 03 आरोपी पैकी आरोपी न. 1. रा. पुगाव ता.रोहा, आरोपी न. 2 व 3 रा.तळवली ता. रोहा यांनी संगमताने शासनाचे वेळोवेळी कोरोना विषाणूचा प्रसार
थांबविण्याकरिता जारी केलेल्या आदेशाचे उल्लंघन करून एकूण 2100/- रुपये किंमतीच्या विदेशी दारू मोटार सायकल सह ( 40,000/- रुपये किमतीची ) यावर आरोपी न.1 हा त्याचे ताबे कब्जात बाळगले स्थितीत मिळून आला असून सदर विदेशी दारू आरोपी न. 2 व 3 यांचे
कडून घेऊन संगनमत करून विना परवाना गैर कायदा विक्री करिता स्वत:चे ताबे कब्जात बाळगले स्थितीत मिळून आला. सदर गुन्ह्यात मोटार सायकलसह एकूण 42,100/- रुपये किमतीचा माल हस्तगत केला आहे. याबाबत कोलाड पोलीस ठाणे येथे गु.र.न. 27/2020 भा.द.वी.सं.कलम 188, दारूबंदी अधिनियम 1949 चे कलम 65 ई, 83 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास
पोहवा/2119 ए.आर.म्हात्रे हे करीत आहेत.