दर्शन पोलीस टाइम : परवेज शेख
पिंपरी चिंचवड, दि. १६ जुलै : अवैध अग्निशस्त्रांची तस्करी
करणाऱ्या मध्यप्रदेश व महाराष्ट्रातील २६ आरोपींच्या आंतरराज्य टोळीचा
गुन्हे शाखा, युनिट-४ पिंपरी चिंचवडकडून पर्दाफाश करण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, दि. ६ मार्च रोजी युनिट-४ चे पोलीस नाईक
लक्ष्मण आढारी यांना मिळालेल्या माहितीनुसार गणेश माळी (रा. सांगवी)
याला अग्निशस्त्रासह वाकड पोलिसांनी अटक करून त्याच्याविरूद्ध गुन्हा
दाखल केला होता. त्याने सदरचे अग्निशस्त्र ग्यानोबा उर्फ गोटू मारूती गिते
(रा. परळी, ता बीड) याच्याकडून घेतल्याचे सांगितल्याने गिते याला अटक
करून त्यावेळी त्या दोघांकडून ६ पिस्टल, १५ जिवंत काडतुसे जप्त
करण्यात आली होती. त्यावेळी केलेल्या तपासात गिते याने मध्यप्रदेश
येथील धार जिल्ह्यातील सरदार याकडून शस्त्रे आणल्याचे सांगितले होते.
तपासासाठी गेलेल्या पथकाने आरोपीसंदर्भात काढलेल्या माहितीच्या
अनुषंगाने लॉकडाऊनच्या कालावधीत गुन्हे शाखा युनिट ४ चे वरिष्ठ पोलीस
निरीक्षक मोहन शिंदे, सहायक पोलीस निरीक्षक अंबरीष देशमुख, शिपाई
प्रशांत सैद यांनी मध्यप्रदेश येथील आरोपींच्या अनुषंगाने तांत्रिक विश्लेषण
करून एका पथकास मध्यप्रदेशात पाठवले. सदर पथकाने तेथे आरोपी व
त्यांचे शस्त्र खरेदीविक्रीबाबत सविस्तर अभ्यास केला. सदर प्रकरण गंभीर
असल्याचे लक्षात येताच लॉकडाऊनचे नियम शिथिल होताच गुन्हेचे पोलीस
उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहायक पोलीस आयुक्त राजाराम पाटील यांच्याशी
मुख्य आरोपीस ताब्यात घेण्याबाबत चर्चा करून ऍक्शन प्लॅन तयार
करण्यात आला. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिंदे यांच्या
मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक देशमुख व पथक प्रतिहल्ला
होण्याची शक्यता लक्षात घेऊन ग्राम सिंघाना, थाना मनावर, जिल्हा धार,
मध्यप्रदेश येथे रवाना झाले. सदर पथकाने त्याठिकाणी २ दिवस तळ ठोकून
वेशांतर करून त्या भागातून मुख्य आरोपी मनिसिंग गुरूमुखसिंग भाटीया
याला कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊनही ताब्यात घेऊन
त्याच्याकडून ११ गावठी पिस्टल व २२ जिवंत काडतुसे जप्त करण्यात
आली.
सदर आरोपीकडे केलेल्या तपासादरम्यान त्याने व त्याचा साथीदार
कालुसिंग जसवंत सिंग ग्राम सिंघाना, थाना मनावर, जिल्हा धार, मध्यप्रदेश
याने महाराष्ट्रातील कुश पवार रा. तळेगाव दाभाडे, प्रसन्न पवार रा. गोडुंबे,
रा. शिरगाव, आकाश उर्फ बाळा वाघमोडे रा. कुर्ल्डवाडी जिल्हा सोलापूर व
योगेश कांबळे रा परांडा, जिल्हा उस्मानाबाद गोटू गिते, रा. बीड या टोळी
प्रमुखांना मोठ्या प्रमाणावर अग्निशस्त्रे विकल्याचे निष्पन्न झाले.
सदर आरोपींना अटक केल्यानंतर त्यांनी २९ पिस्टल आणून ते ९ आरोपींना
विकल्याचे निष्पन्न झाले. यात कुश पवार (रा. तळेगाव दाभाडे), प्रसन्न
पवार (रा. गोडंब्रे ता. मावळ), आकाश पडळघरे (रा. रिहे, ता. मुळशी),
प्रकाश उर्फ पप्पु मांडेकर (वय २७, रा. आंबेठाण, ता. खेड), ओंकार उर्फ
अभिजित बाजीराव ढमाले (वय २६, रा. जुनी सांगवी), संतोष राठोड (रा.
तळेगाव दाभाडे), तुषार बावकर (वय २५ रा. कासारसाई, ता. मुळशी,
जिल्हा पुणे), शिवकुमार मुरगन उर्फ बल्ली (रा. आंबेडकर नगर, देहुरोड),
सिराज शेख (वय ३४, रा. आंबेठाण, ता. खेड) यांचा समावेश आहे.
त्यापैकी कुश पवार, प्रसन्न पवार, प्रकाश मांडेकर, सिराज शेख यांचेकडून
१८ पिस्टल व २२ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. सदर आरोपींपैकी
बहुतेकांचे पोलीस रेकॉर्ड असल्याचेही कळते.
तसेच बाळा वाघमोडे व योगेश कांबळे या टोळी प्रमुखाने २७ पिस्टल
आणून ते दहा आरोपींना विकले. त्यात बाळा वाघमोडे (वय २५, रा.
कुडुवाडी, सोलापूर), योगेश कांबळे (वय २४, रा. शिराळा, ता. परांडा, जि.
उस्मानाबाद), अक्षय केमकर (वय २८ रा. मेडद, ता. माळशिरस, जिल्हा
सोलापूर), योगेश उर्फ आबा बापुराव तावरे (वय २४, रा. माळेगाव, ता.
बारामती), चेतन उर्फ मामा गोविंद लिमन (वय २८, रा. लिंबाची तालीम, ता.
हवेली), प्रज्ञेश नेटके (रा. चिंचवडगाव), मयुर घोलप (रा. बिबवेवाडी, पुणे),
विकी घोलप (रा.बिबवेवाडी, पुणे), राजू भाळे (रा. इंदापूर), सोमनाथ उर्फ
सोमा रमेश चव्हाण (रा. कालगाव, ता. कराड, जि. सातारा) यांचा समावेश
असून यातील दोन्ही घोलप तडिपार असून बाकींचेही पोलीस रेकॉर्ड
असल्याचे समोर आले आहे. त्यांच्याकडून ७ पिस्टल व ७ जिवंत काडतुसे
व सेलेरो कार जप्त करण्यात आली आहे. यात एकूण २६ आरोपी निष्पन्न
झाले असून १५ आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच आरोप
गीतेकडून ६ पिस्टल व १५ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.
सदर गुन्ह्याचा तपास अंबरीष देशमुख सहायक पोलीस निरीक्षक, गुन्हे
शाखा, युनिट-४, पिंपरी चिंचवड करीत आहेत.
सदर कारवाई पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, अपर
पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त सुधीर
हिरेमठ, सहायक पोलीस आयुक्त राजाराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली
गुन्हे शाखा युनिट-४ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन शिंदे, सहायक पोलीस
निरीक्षक अंबरीष देशमुख, हवालदार प्रविण दळे, नारायण जाधव, संजय
गवारे, धर्मराज आवटे, दादाभाऊ पवार, आदिनाथ मिसाळ, पोलीस नाईक
संतोष असवले, तुषार शेटे, लक्ष्मण आढारी, मो. गौस नदाफ, वासुदेव मुंडे,
: