अवैध गांजा या अंमली पदार्थाची विक्री करणार्या आरोपींवर स्थानिक गुन्हे अन्वेषण रायगड यांच्या कडून ठोस कारवाई

- Advertisement -

बोरघर / माणगांव : ( विश्वास गायकवाड ) रायगड जिल्हातील युवा पिढी व कॉलेज मधील मुले गांजा या अंमली पदार्थ सेवनाच्या आहारी जावून त्यांचे शैक्षणिक तसेच सामासीक आयुष्य उध्वस्त होत असल्या बाबत बऱ्याचशा तक्रारी मा. पोलीस अधिक्षक रायगड श्री. अनिल पारस्कर यांच्याकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे रायगड जिल्हातील अवैध गांजा विक्री करणाऱ्या इसमांची माहिती मिळवून त्यांच्या विरूध्द ठोस कारवाई करण्याबाबत मा. श्री. अनिल पारस्कर, पोलीस अधीक्षक, रायगड यांनी पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, रायगड यांना दिले होते. ” सद्रक्षणाय खलनिग्रहणाय ” या पोलीस प्रशासनाच्या ब्रीद वाक्या प्रमाणे आचरण असलेले रायगडचे कर्तव्यदक्ष, कर्तव्य कठोर आणि कार्यक्षम पोलीस अधीक्षक माननीय श्री. अनिल पारस्कर श्री. जे. ए. शेख, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, रायगड यांनी त्यांचे गोपनिय बातमीदार यांना सतर्क करून सुचना दिल्या होत्या. त्याचप्रमाणे अलिबाग व परिसरातील काही व्यक्ती ह्या होलसेल व किरकोळ स्वरूपात गांजा या अंमली पदार्थांची विक्री करीत असल्याची खात्रीशिर बातमी पोलीस निरीक्षक श्री. जे. ए. शेख, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, रायगड-अलिबाग यांना त्यांचे खास खबऱ्यांनी दिली. त्याप्रमाणे मा. पोलीस अधीक्षक, रायगड व मा. अप्पर पोलीस अधीक्षक, रायगड यांचे मार्गदर्शना प्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पथकाने अलिबाग पोलीस ठाणे हद्दीतील मौजे चोरोंडे गावचे हद्दीत एम.आय.डी.सी. पाईप लाईन जवळ सापळा लावून पाळत ठेवली असता दिनांक २८/०८/२०१९ रोजी दुपारी ४: १५ वाजण्याचे सुमारास मिळालेल्या गोपनिय माहिती प्रमाणे इसम नामे गणेशइंद्र मोहन झा, वय-२९ वर्षे, सध्या रा. एम.आय.डी.सी. पाईप लाईन जवळ, श्री. गिराधीलाल बरालिया यांची आंब्याची वाडी, चोरोंडे, पो. सोगाव, ता. अलिबाग, जि. रायगड, मुळ रा. महाव्दार, पो. घनश्यामपुर, जि. दरभंगा, राज्य-बिहार हा संशयास्पद स्थितीत मिळून आला. त्यास ताब्यात घेवून त्याच्या कडे असलेल्या एका पिशवीची झडती घेतली असता त्यावे जवळ एकूण १३१५०/- रुपये किमतीचे व एकूण सुमारे १. ३१५ कि.ग्रॅम वजनाचा गांजा हा अंमली पदार्थ मिळून आला. त्यामुळे नमूद इसमा विरूध्द कायदेशिर कारवाई करून त्याच्या विरूध्द अलिबाग पोलीस ठाणे कॉ.गु.रजि.नं. १११/२०१९, गुंगीकारक औषधे द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ चे कलम ८ (ग) व २० (ख) चे उल्लंघन (२) (ग) प्रमाणे दिनांक २८/०८/२०१९ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्याचप्रमाणे प्राप्त गोपनिय माहितीच्याच अाधारे रोहा पोलीस ठाण्याच्या हद्दीत खालचा मोहल्ला, धावीर रोड रोहा, ता. रोहा येथे राहणारा इसम नामे अब्दुल गफार मेमन या व्यक्तीकडे देखील ८०००/- रुपये किंमतीचा ८०० ग्रॅम गांजा हा अंमली पदार्थ मिळून आल्याने त्याच्या विरूध्द देखील रोहा पोलीस ठाणे कॉ.गु.रजि.नं. ७९/२०१९ गुंगीकारक औषध द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ चे कलम ८ (ग) व २० (ख) चे उल्लंघन (२) (ग) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदरची कारवाई ही श्री. जे. ए. शेख, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, रायगड तसेच श्री. आर. एम. परदेशी, पोलीस निरीक्षक, रोहा पोलीस ठाणे यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सपोनि. श्री. डी. सी. पोरे व त्यांच्या पथकाने तसेच रोहा पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकारी/ कर्मचारी यांनी केली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, रायगड यांच्या मार्फत यापुवी्र देखील खोपोली, खालापूर, अलिबाग या पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणावर गांजा तसेच कोकेन अशा अंमली पदार्थाची अवैध वाहतूक व विक्री करणाऱ्या इसमांना पकडण्यात आलेले असून त्यांच्या विरूध्द देखील कडक कायदेशिर कारवाई करण्यात आलेली आहे. भविश्यात देखील मा. श्री. अनिल पारस्कर पोलीस अधिक्षक रायगड, मा. सचीन गुंजाळ, अप्पर पोलीस अधिक्षक, रायगड यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हातील अवैध गांजा तसेच अन्य मादक व अंमली पदार्थांचा साठा व वाहतूक व विक्री करणाऱ्या गुन्हेगारां विरूध्द श्री. जे. ए. शेख, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, रायगड यांच्या नेतृत्वाखाली ठोस मोहिम राबविण्यात येत असून जिल्ह्यातील अवैध अंमली पदार्थांच्या व्यवसायचे रॅकेट पूर्णपणे नेस्तनाबूत करण्याची काय्रवाही सुरूच ठेवण्यात येणार आहे.
तसेच अशा प्रकारच्या कोणत्याही अवैध व्यवसायांची नागरीकांना माहिती असल्यास त्यांनी व्यक्तिश: पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, रायगड यांना कळवावी, आपले नांव गुप्त ठेवण्यात येईल असे आवाहन त्यांच्या मार्फत जनतेस याव्दारे करण्यात येत आहे.

- Advertisement -