सध्या कोरोना (कोव्हीड-19) विषाणू प्रादुर्भावावर नियंत्रण आणण्याकरीता घोषित केलेल्या संचार बंदी काळात बिअर शॉप, वाईन शॉप परमिट रुम इत्यादींना सर्व प्रकारचे दारु विक्रीवर शासनाने निर्बंध घातले असताना देखील खालील पोलीस ठाणे हद्दीत सदर नियमांचे उल्लंघन केले बाबत गुन्हे दाखल आहेत.
पोयनाड पोलीस ठाणे हद्दीत:- दिनांक 29/04/2020 रोजी 21.30 वा.सुमारास मौजे वडवली गावचे हद्दीत सिंग फार्म हाऊसच्या रस्त्याच्या लगत असणाऱ्या टेकडीवर एकूण 03 आरोपी यांनी महा कोविड-19 ची साथ चालु असताना तोंडाला कोणताही मास्क न लावता राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन करून आरोपी नं.1 रा.वडवली ता.अलिबाग याने गैरकायदा विनापरवाना एकूण 2,485/- रुपये किंमतीची गावठी हातभट्टीची दारू विक्री करीत असताना व आरोपी नं.2 व 3 रा.वडवली आदिवासी वाडी ता.अलिबाग हे दारू पीत असताना मिळून आले. सदर गुन्ह्यात एकूण 45,000/- रुपये किमतीची मोटार सायकल सह असा एकूण 47,485/- रुपये किमतीचा माल पोलिसांनी हस्तगत केला आहे.
याबाबत पोयनाड पोलीस ठाणे येथे गु.र.न. 36/2020, भा.द.वि.सं.कलम 188, 269, 270 महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कायदा 1949 चे कलम 65 खंड (ई) 83, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कलम 51 (ब,) महाराष्ट्र कोविड-19 उपाययोजना नियम-12, साथीचा रोग प्रतिबंधक कायदा कलम 2, 3, 4 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन अधिक तपास सफौ/ के.आर.भऊड हे करीत आहेत.
तरी रायगड जिल्हा पोलीस दलातर्फे आवाहन करण्यात येते की, शासनाने सद्यस्थितीत निर्गमित केलेले नियम पाळावेत तसेच या नियमांची कोणी पायमल्ली करीत
असेल तर सबंधित पोलीस ठाणे अगर नियंत्रण कक्षास तात्काळ कळवावे.