हायलाइट्स:
- अनुष्काने शेअर केला महिलेचा अविश्वसनीय व्हिडीओ
- एका हाताने कॅच पकडणाऱ्या महिलेची चाहती झाली अनुष्का शर्मा
- पोस्ट शेअर करत अनुष्काने करून दिली स्त्री शक्तीची जाणीव
‘मला माफ कर…’ एक्स वाइफ रिनाचं पत्र वाचून आमिर रडला
महिलेने स्टॅण्डमध्ये आलेला चेंडू एका हाताने झेलला होता. त्यावेळेस तिच्या दुसऱ्या हातात बाळ होतं. एका हाताने चेंडू झेलणाऱ्या या महिलेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड वायरल झाला होता. या व्हिडिओला कॅप्शन देण्यात आलं होतं, ‘आई एका मुलाला पकडून काहीही करू शकते, एक फाऊल बॉलदेखील पकडू शकते.’ हा चेंडू पकडणं मुळीच सोपं नव्हतं त्यामुळे अनेकांनी त्या महिलेचं कौतुक केलं. आता अनुष्काने देखील तो व्हिडीओ आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे आणि त्याला हटके कॅप्शन दिलं आहे. अनुष्काने पोस्ट शेअर करत लिहिलं, ‘असं काहीच नाहीये जे आम्ही करू शकत नाही.’
अनुष्काने या पोस्टमध्ये त्या महिलेचं भरभरून कौतुक केलं आहे. अनुष्काच्या स्टोरीवरून ती देखील त्यामहिलेची चाहती झाली असल्याचं दिसतंय. अनुष्काने नुकताच एका मुलीला जन्म दिला आहे. त्यामुळे अशी अविश्वसनीय कामगिरी करणाऱ्या आईला पाहून अनुष्काचा हुरूप आणखीनच वाढला आहे. अनुष्का सध्या विराट आणि वामिकासोबत इंग्लंडमध्ये आहे. अनुष्का शेवटची ‘झिरो’ चित्रपटात दिसली होती.