एका युझरनं अमृताच्या फोटोंवर कमेंट करताना लिहिलं की, ‘हे असले घातक फोटोशूट करताना वाघाचं काळीज पाहिजे फोटोग्राफरचे’. या युझरच्या कमेंटला अमृतानंही उत्तर दिलंय. ‘आईने काढलेत फोटो’ असं उत्तर अमृतानं दिल्यानंतर चाहत्यांनी अमृता आणि तिची आई या दोघींचं कौतुक केलंय. ‘मग आई वाघीण आहे, असंही एका युझरनं म्हटलंय.
अमृताच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर ‘राझी‘, ‘सत्यमेव जयते’, ‘मलंग’ अशा हिंदी चित्रपटांमध्ये अभिनेत्री अमृता खानविलकर झळकली. या चित्रपटांमध्ये तिनं साकारलेल्या भूमिकांचं कौतुकही झालं. छोट्या पडद्यासह मोठ्या पडद्यावरही तिनं वेळोवेळी तिच्या अदाकारीची कमाल दाखवली आहे. मध्यंतरी आलेल्या ‘ वेल डन बेबी ‘ या मराठी चित्रपटात ती झळकली आणि चाहत्यांना तिची ही भूमिकाही आवडली. आगामी काळातही सातत्यानं वैविध्यपूर्ण भूमिकांमध्ये आपण समोर येणार असल्याचं ती सांगते.