अहमदनगर | जिल्ह्यात आज 9 रुग्णांची वाढ, एकूण कोरोना बाधितांची संख्या 112 वर

- Advertisement -

अहमदनगर : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. आज जिल्ह्यात नव्या नऊ रुग्णांची वाढ झाली आहे. 60 अहवालांपैकी 51 अहवाल निगेटिव्ह तर 9 अहवाल हे पॉझिटिव्ह आले आहेत. घाटकोपरहून अकोले तालुक्यातील पिंपळगाव खांड येथे आलेले 1, ठाणे येथून पारनेर हिवरे कोरडा येथे आलेला 1, चाकण (पुणे) येथून ढोर जळगाव शेवगाव येथे आलेला 1, संगमनेर 2, निमगाव (राहाता) 4 रुग्ण आहेत. बाधीत रुग्णामध्ये 4 पुरुष, 4 महिला आणि एका चार वर्षीय लहान मुलीचा समावेश आहे. जिल्हयात बाधिताची संख्या 112 वर गेली आहे.

- Advertisement -