डी.पी.टी. | ऑनलाइन वृत्त : कोरोनातुन बचावलेल्या पोलीस कर्मचार्याचा वांबोरी रेल्वे स्टेशन नजीक झालेल्या रस्ता आपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
माधव संपत शिरसाठ वय 28 असे मयताचे नाव असून ते मुंबई च्या सहारा पोलीस ठाण्यात नोकरी करत होते.
काही दिवसांपूर्वी त्यांचा कोरोना अहवाल पाॅझिटीव आला होता, औषध उपचारादरम्यान ते त्यातून बरे झाले होते.
दरम्यान कोरोनासोबत युध्द त्यांनी जिंकल्यानंतर आणि डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांचे मुळ गाव कडगाव येथे ते आले होते.
मित्रा समवेत मुळा धरण पाहून झाल्यावर परत जात असताना हा अपघात झाला यात पाच जण जखमी झाले आहेत. सदरची घटना ही अत्यंत दुर्दैवी असून पोलीस कॉन्स्टेबल माधव संपत शिरसाठ यांच्या पश्चात पत्नी व पंधरा महिन्याची मुलगी आई वडील यांना एकुलते एक असलेले माधव शिरसाठ यांच्या अपघाती निधनाने मुंबई पोलीस दलातील त्यांचे सहकारी मित्र राहुल वनवे यांना माधव शिरसाठ आपल्यातून गेल्याचे कळताच त्यांना दुःख आवरणे अशक्य झाले माधव शिरसाठ यांचे सहकारी पोलीस मित्र राहुल वनवे यांनी त्यांच्या दुःखात सहभागी होत सिरसाठ यांच्या कुटुंबीयांना आधार देत त्यांच्या कुटुंबाला दुःखात सहभागी होत माधव शिरसाठ यांच्या आत्म्यास शांती लाभो अशी प्रार्थना करतो असे असे आम्हा स सांगितले
डी पी टी. | दर्शन पोलिस टाइम लाईव्ह वेब न्यूज समुहा कडून मुंबई पोलीस कोविड-१९ योद्धा माधव संपत शिरसाठ यांना भावपूर्ण श्रद्धांजली ..!