अहमदनगर : अहमदनगर येथे धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथे राहणाऱ्या परप्रांतिय मुलावर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली. रेल्वे स्टेशन परिसरात हा प्रकार समोर आला. मुलाला उपचारांसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. अज्ञात व्यक्तिविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.