पुणे : परवेज शेख सदर बाबत अधिक माहिती अशी की, खडक पोलीस स्टेशन तपास पथकातील अधिकारी/कर्मचारी हे खडक पोलीस स्टेशनला हजर असतांना पोकॉ समीर माळवदकर व पोना राहुल धोत्रे यांना त्यांचे बातमीदाराने बातमी दिली की, इसम नामे आकाश ऊर्फ कल्लु भोरे रा.गंज पेठ याने साधारण चार ते पाच दिवसांपुर्वी महात्मा फुले स्मारकाजवळ येथुन अॅक्टीव्हा गाडी चोरली असुन तो गाडीसह बी.एस.एन.एल ऑफिस हरकानगर काशेवाडी येथे थांबला असुन त्याचे वर्णन सांगीतले. त्याप्रमाणे सदरची बातमी मा. भरत जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक खडक पोलीस स्टेशन पुणे यांना कळवुन त्यांचे मार्गदर्शनाखाली सदर ठिकाणी तपास पथकाचे कर्मचाऱ्यासह सापळा लावण्यात आला.
बातमीचे वर्णनाप्रमाणेचा इसम हा बी.एस.एन.एल ऑफिसचे थांबला असल्याचे सर्व स्टाफना दिसल्याने त्यास स्टाफचे मदतीने ताब्यात घेण्यात आले त्यास त्याचे नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव आकाश ऊर्फ कल्लु संजय भोरे वय २१ वर्षे रा.महात्मा फुलेवाडया जवळ, गंज पेठ पुणे असे सांगितले. त्याचेकडे ताब्यात असलेली काळया रंगाची अॅक्टीव्हा एम एच १२ एच के १४४० हिचे कागदपत्राबाबत विचारणा केली तो उडवा उडवीची उत्तरे देवुन लागल्याने त्यास गाडीसह खडक पोलीस स्टेशन येथे आणुन त्याला विश्वासात घेवुन तपास करता त्याने सदरची गाडी ही चार ते पाच दिवसापुर्वी आमचे येथील महात्मा फुले वाडयाचे येथील रोडवरुन चोरली असल्याचे सांगितले, त्याबाबत आम्ही आमचेकडील अभिलेखाची पडताळणी करता सदर गाडी बाबत खडक पोलीस स्टेशन्न गुन्हा रजि नं ३७१/२०१९ भा.दं.वि क ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल झाले.
सदर आरोपी याचेकडे वाहनचोरीचे अनुषंगाने अधिक तपास करत असताना त्याने सुमारे दोन वर्षापासुन्न पुणे शहरामध्ये सिंहगड, बुधवार पेठ व शुक्रवार पेठ या परिसरातुन वेगवेगळया ठिकाणावरुन अॅक्टीव्हा गाडया चोरलेल्या असल्याचे सांगुन त्याचेकडुन खडक, दत्तवाडी, फरासखाना पोलीस स्टेशनचे हद्दीतुन चोरीस गेलेल्या एकुण १,७५,०००/- रु किं च्या ५ अॅक्टीव्हा गाडया जप्त करण्यात आल्या आहेत.
सदरची कारवाई ही डॉ. संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग पुणे ,श्रीमती. स्वपना गोरे, पोलीस उप आयुक्त परिमंडळ १ व श्री. प्रदिप आफळे ,सहा पोलीस आयुक्त फरासखाना विभाग यांचे मार्गदर्शनाखाली खडक पोलीस स्टेशन चे श्री. भरत जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.उत्तम चक्रे पोलीस निरीक्षक (गुन्हे) तपास पथकाचे प्रभारी सहा पोलीस निरीक्षक श्री.उमाजी राठोड, पोलीस कर्मचारी, अजिज बेग, विनोद जाधव, गणेश सातपुते, संदिप पाटील, राहूल धोत्रे, समीर माळवदकर, इम्रान नदाफ, सागर केकान, राकेश क्षिरसागर, संदिप कांबळे, रवी लोखंडे, योगेश जाधव, विशाल
जाधव, रोहन खैरे, यांचे पथकाने केली आहे.