आंतरराष्ट्रीय कोकेन उत्पादकाला अटक; तीन कोटींचे अमली पदार्थ हस्तगत

- Advertisement -

मुंबई : आंतरराष्ट्रीय कोकेन उत्पादकाला शनिवारी अमली पदार्थविरोधी पथकाने (एएनसी) अटक केली. आझाद मैदान विभागाने ही कारवाई केली. तो मूळचा घानाचा आहे. त्याच्याकडून ३ कोटींचे अमली पदार्थ हस्तगत करण्यात आले आहेत.
फ्रॅंक जॉन (२३) असे अटक आरोपीचे नाव आहे. तो सध्या नवी मुंबईच्या खारघर परिसरात राहत होता. पायधुनीच्या कर्नाटक पुलाजवळ काही जण अमली पदार्थ विक्रीसाठी येणार आहेत, अशी माहिती एएनसीच्या आझाद मैदान विभागाचे पोलीस निरीक्षक वाधवणे यांना मिळाली होती. त्यानुसार शुक्रवारी साहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कदम, प्रशांत मोरे आणि पथकाने त्या परिसरात सापळा रचला. त्या वेळी जॉन तेथे आला. त्याचे वागणे संशयास्पद वाटल्याने त्यांनी त्याला ताब्यात घेत अंगझडती घेतली. त्याच्याकडे पोलिसांना ५०० ग्रॅम कोकेन सापडल्याने त्याला अटक करण्यात आली. या अमली पदार्थाची किंमत सुमारे ३ कोटी आहे.

- Advertisement -