मुंबई: आज जगभरात हा ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ साजरा होतोय. याच पार्श्ववभूमीवर मराठी अभिनेत्री कृतिका गायकवाड हिने मुंबई च्या ऐतिहासिक स्थळांवर तिचे सुंदर फोटोशूट केले.
या आसनांसाठी तिने मुंबईच्या ऐतिहासिक स्थळांची निवड केली. मुंबईच्या एशियाटिक लायब्ररी आणि सीएसटी स्टेशन समोरील सेल्फी पॉईंट ह्या गजबजलेल्या ठिकाणी तिने हे फोटोशूट केले . कोरोना काळात सर्वांनी स्वतःची काळजी घ्यावी या उद्देशाने तिने हे फोटोशूट केले .
- Advertisement -