Home पोलीस घडामोडी आईच्या अंत्यसंस्कारासाठी आलेल्या पोलीस अधिकाऱ्याची कार गेली चोरीस

आईच्या अंत्यसंस्कारासाठी आलेल्या पोलीस अधिकाऱ्याची कार गेली चोरीस

0

यवतमाळ : वृद्ध आईच्या अंत्यसंस्कारासाठी अकोला येथून आलेल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकाची कार अज्ञात चोरट्याने लंपास केली. ही घटना येथील समनानी ले – आऊट परिसरात ८ ऑगस्टच्या रात्री घडली. या प्रकरणी अकोला येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश काशीनाथ अणे यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

 गणेश अणे हे अकोला पोलीस अधीक्षक कार्यालयात वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत आहे. तर त्यांची आई केसरबाई काशीनाथ अणे यांचे ८ ऑगस्ट  रोजी यवतमाळ येथे निधन झाले. यवतमाळ येथील एसटी कॉलनी समनानी ले-आऊट परिसरात राहणारे अणे यांचे जावई रतनसिंग बद्दू पवार यांच्या घरी केसरबाई यांच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू होती. त्यासाठी गणेश अणे हे अकोला येथून  पुतण्या ललीत सीताराम राठोड याची कार (एम.एच.२९/ए.डी.२५३४) घेवून सायंकाळी रतनसिंग पवार यांच्या घरी पोहोचले. संपूर्ण कामकाज आटोपल्यानंतर त्यांनी ही कार जावयाच्या घराशेजारीच रात्रीदरम्यान ठेवली होती. मात्र अज्ञात चोरट्याने ही गाडी चोरून नेल्याची तक्रार अणे यांनी दाखल केली आहे. या गाडीत एक  लॅपटॉप आणि दोन मोबाईलही असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.