आईच्या खुनासाठी पिस्तूल दिल्याने मुलीची आत्महत्या

- Advertisement -

आग्रा : प्रत्यक्ष जन्मदात्या पित्याने गावठी पिस्तूल देऊन आपली आई आणि दोन भवाडांना ठार मारण्यास सांगितल्याने एका 16 वर्षीय तरूणीने आत्महत्या केली. या मुलीने लिहलेली चार पानी चिठ्ठी पोलिसांनी हस्तगत केली आहे.

येथील सदर पोलिस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला. या मुलीने बनवलेला एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या भयानक घटनेला वाचा फुटली. आत्महत्येपुर्वी बनवलेल्या या व्हिडिओत ही मुलगी मला पोलिस अधिकारी बनून माझी आई, मोठा भअऊ आणि लहान बहिणीला न्याय मिळवून द्यायचा आहे असे सांगत आहे. या व्हिडिओत तिच्या काकाने तिला तिच्या आईला मारण्यासाठी गावठी बनावटीचे पिस्तूल दिल्याचे सांगितले आहे.

मात्र त्याऐवजी तिने स्वत:चे आयुष्य संपवले. तिचे दोन काका, वडील आणि चुलत भाऊ मिळून माझा, भावंडांचा आणि आईचा छळ करत असल्याचे तीने म्हटले आहे. आपल्या वडिलांनी त्यांच्या पहिल्या पत्नीचा आणि चार मुलांची हत्या केली आहे. काकही कारावास भोगून आले आहेत, असेही तीने आपल्या चिठ्ठीत नमूद केले आहे. पोलिसांनी तिच्या वडिलांना अटक केली असून अन्य आरोपी फरार आहेत.

- Advertisement -