Home ताज्या बातम्या आईच्या स्मरणार्थ वर्तक कुटुंबियांनी मुख्यमंत्री सहायता निधी करिता 1 लाख रुपयांचा धनादेश केला जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याकडे सुपूर्द

आईच्या स्मरणार्थ वर्तक कुटुंबियांनी मुख्यमंत्री सहायता निधी करिता 1 लाख रुपयांचा धनादेश केला जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याकडे सुपूर्द

0

अलिबाग: करोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी राज्य शासनाला मदत म्हणून आई कै.शोभा हरिराम वर्तक यांच्या स्मरणार्थ सर्वश्री.योगेश हरिराम वर्तक, संतोष हरिराम वर्तक,संदेश परशुराम वर्तक,राजेंद्र गजानन वर्तक यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधी करिता 1 लाख रूपयांचा धनादेश जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांच्याकडे  आज येथे सुपूर्द केला.

       राष्ट्रीय आपत्तीच्या या काळात वर्तक कुटुंबियांनी केलेल्या या मोलाच्या सहकार्याबद्दल  जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी त्यांचे आभार मानले असून जिल्ह्यातील इतर सामाजिक संस्थांनी, कंपन्यांनी, व्यक्तींनी मदतीसाठी पुढे यावे,असे आवाहनही केले आहे.