हायलाइट्स:
- मिलिंद सोमण आणि अंकिता कोंवर २०१८ साली अडकले होते लग्नाच्या बेडीत
- सोशल मीडियावर युझरनं अंकिताला विचारला फॅमिली प्लॅनिंगबाबत प्रश्न
- फॅमिली प्लॅनिंगबाबत प्रश्न विचारणाऱ्या युझरला अंकितानं दिलं सडेतोड उत्तर
अंकिता कोंवरच्या प्रश्नोत्तरांच्या सेशनमध्ये एका युझरनं तिला विचारलं, ‘तुमच्या लग्नाला आता बरीच वर्षं झाली. मग आता फॅमिली प्लॅनिंगबद्दल तुझा काय विचार आहे?’ या युझरच्या प्रश्नाचं उत्तर देताना अंकितानं लिहिलं, ‘आम्ही एका नियोजत फॅमिली आहोत, आता पुढे…’ याशिवाय आणखी एका युझरनं अंकिताला विचारलं, ‘भारतात स्वतःहून खूप जास्त वयाच्या व्यक्तीशी लग्न करणं भारतात फारसं चांगलं मानलं जात नाही. मग तू तुझं लाइफ कसं मॅनेज करतेस. या सर्व गोष्टींशी कसं जुळवून घेतेस?’

युझरच्या या प्रश्नाचं उत्तर देताना अंकिता म्हणाली, ‘या समजात लोक त्याबद्दल जास्त बोलतात जे समाजाच्या दृष्टीकोणातून सामान्य नाही. हे फक्त भारतातच नाही तर जगातही आहे. माणसांची सवय असते काही वेगळी गोष्ट दिसली की, त्यावर विचित्र प्रतिक्रिया देण्याची. हे एक कौशल्य आहे आणि आपण अशा लोकांना नेहमीच समजावून सांगू शकत नाही. त्यामुळे मी नेहमी त्याच गोष्टी करते ज्यातून मला आनंद मिळतो.’
मिलिंद सोमण आणि अंकिता कोंवर २२ एप्रिल २०१८ रोजी लग्नाच्या बेडीत अडकले होते. त्यांचा हा विवाहसोहळा अलिबागमध्ये पार पडला होता. या लग्नासाठी फक्त मिलिंद आणि अंकिताच्या कुटुंबातील व्यक्ती आणि मित्रपरिवारच उपस्थित होता. फिटनेसच्या बाबतीत मिलिंद आणि अंकिता दोघंही खूप जागरुक आहेत. ते नेहमीच एकत्र धावताना किंवा वर्कआऊट करताना दिसतात. याशिवाय त्यांच्या सोशल मीडिया पोस्टही खूप व्हायरल होताना दिसतात.