Home बातम्या ऐतिहासिक आचार्य श्री महाश्रमण जी यांच्या वास्तव्याने महाराष्ट्राची भूमी पावन – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

आचार्य श्री महाश्रमण जी यांच्या वास्तव्याने महाराष्ट्राची भूमी पावन – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

0
आचार्य श्री महाश्रमण जी यांच्या वास्तव्याने महाराष्ट्राची भूमी पावन – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे, दि. 28 (जिमाका) – महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. आचार्य श्री महाश्रमण यांचे महाराष्ट्रात पाच महिने वास्तव्य आहे. या वास्तव्याने महाराष्ट्राची भूमी समृद्ध आणि पावन होणार आहे. सर्व लोकांच्या जीवनात खुशाली, बदल आणि चांगले दिवस येतील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले.


ठाण्यात आयोजित आचार्य श्री महाश्रमण चातुर्मास प्रवेश स्वागत व अभिनंदन कार्यक्रम प्रसंगी मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. यावेळी खासदार राहुल शेवाळे, आमदार प्रताप सरनाईक, आमदार गीता जैन, यांच्यासह जैन समाजातील मुनी, प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. आचार्य श्री. महाश्रमण जी यांचे चातुर्मासासाठी ठाणे येथे आगमन त्यानिमित्त यावेळी मिरवणूक काढण्यात आली.
मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, आचार्य श्री महाश्रमणजी हे सद्भावना, नैतिकता व नशामुक्तीचे काम मिशन मोडवर करत आहेत. मनुष्य सेवा ही ईश्वर सेवा असे मानून कोट्यावधी लोकांना नशेमधून बाहेर काढण्याचे काम त्यांनी केले. या कोट्यावधी लोकांच्या नातेवाईकांचे प्रेम, शुभकामनेमुळे आपल्याला जनतेची आणखी सेवा करण्याची ताकद मिळेल. स्वयंसेवा, राष्ट्रसेवा, जीवनदान क्षेत्रात आपले कार्य अतुलनीय आहे. 55 हजार किमीची पदयात्रा करणे ही महत्त्वाची गोष्ट आहे.
राज्य शासनाने गेल्या वर्षभरात दिवसरात्र काम करून महाराष्ट्राच्या विकासासाठी झटत आहे. या राज्याच्या विकासासाठी आपले आशिर्वाद असावे. तुमच्या नशामुक्ती कामाप्रमाणेच राज्य शासनाने ड्रग फ्रि मुक्त मुंबई मिशन हाती घेतला आहे. यासाठी आपले सहयोग, आशिर्वाद द्यावे, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले.
व्यापारी लोकांना राज्यात संपूर्ण सुरक्षा व सहयोग देण्यात येईल. महाराष्ट्र भूमीला आपला आशिर्वाद असू द्यावे, असेही श्री. शिंदे म्हणाले.

०००००