Home बातम्या आंतरराष्ट्रीय “आजपर्यंत आपले अण्वस्त्र धोरण हे ‘नो फर्स्ट युज’ असे राहिले, भविष्यात काय धोरण असेल हे सांगता येणार नाही – राजनाथ सिंह

“आजपर्यंत आपले अण्वस्त्र धोरण हे ‘नो फर्स्ट युज’ असे राहिले, भविष्यात काय धोरण असेल हे सांगता येणार नाही – राजनाथ सिंह

0

पोखरण: भारताच्या अणवस्त्र धोरणानुसार प्रथम आम्ही हल्ला करणार नाही असे ठरले आहे. पण भविष्यात हे धोरण कायम राहिल की नाही हे त्या वेळच्या परिस्थितीवर अवलंबून असणार आहे, असे वक्तव्य करून भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग याने भारताच्या अणवस्त्र वापराच्या धोरणात बदल होऊ शकतो असे संकेत दिले आहे. त्यामुळे आता पाकिस्तानच्या पायाखालची जमीन सरकरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पोखरण माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना त्यांच्या पहिल्या स्मृतीदिनी आदरांजली वाहिल्यावर राजनाथ सिंग यांनी हे ट्वीट केले आहे.

राजनाथ म्हणाले, “आजपर्यंत आपले अण्वस्त्र धोरण हे ‘नो फर्स्ट युज’ असे राहिले आहे. मात्र, भविष्यात काय घडेल हे त्यावेळच्या परिस्थितीवर अवलंबून असेल” दरम्यान, राजनाथ यांनी याबाबत एक ट्विटही केले आहे. त्या ते म्हणातात, “पोखरण ही अशी जागा आहे ज्यामुळे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी देशाला आण्विक शक्ती म्हणून ओळख मिळवून दिली. तसेच यावेळी त्यांनी ‘नो फर्स्ट युज’ हे तत्वही निश्चित केले. भारत या तत्वाचे कसोशीने पालन करीत आहे मात्र, भविष्यात काय घडेल हे त्यावेळच्या परिस्थितीवर अवलंबून असेल.”

ते म्हणाले, 1998 मध्ये पोखरणमध्ये अण्वस्त्र चाचणी करण्यात आली होती. त्यावेळी अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान होते. तत्पूर्वी राजनाथ सिंह यांनी फेसबूकवर पोस्ट लिहिली होती. यात त्यांनी म्हटलं होतं की, वाजपेयी हे भारतीय राजकारणात युगपुरुष आहेत. त्यांच्या आदर्श तत्वांमुळे सुलभता आणि सुशासन याला राजकारणात चालना मिळाली. सबका साथ, सबका विश्वास याची प्रेरणा आम्हाला त्यांच्याकडूनच मिळाली.