Home ताज्या बातम्या आज भारत बंद, 25 कोटी कामगार संपात सहभागी होणार असल्याचा दावा

आज भारत बंद, 25 कोटी कामगार संपात सहभागी होणार असल्याचा दावा

0

मुंबई : ‘नागरिकविरोधी’ धोरणांच्या निषेधार्थ देशातील 25 कोटी कामगार आज होणाऱ्या देशव्यापी संपात सहभागी होणार असल्याचा दावा दहा केंद्रीय कामगार संघटनांकडून करण्यात आला आहे. आयएनटीयूसी, एआयटीयूसी, एचएमएच, सीआयटीयू, एआययूटीसी, टीयूसीसी, एसईडब्लूए, एआयसीसीटीयू, एलपीएफ, यूटीयूसी यासोबतच अनेक कामगार संघटना या संपात सहभागी होत आहेत. महाराष्ट्रातील विविध सेवांवर या संपाचा मोठा परिणाम होणार आहे.

कामगारांच्या कोणत्याही मागण्यांचे आश्वासन देण्यात कामगार मंत्रालय अपयशी ठरले आहे. यासाठी 2 जानेवारी रोजी एका बैठकीचे आयोजन करण्यात आले. सरकारच्या धोरणांनुसारच कृती करण्याबद्दल सरकारचा दृष्टिकोन असेल असे कामगार संघटनांनी संयुक्त निवेदनात स्पष्ट केले आहे. फीवाढीची रचना आणि शिक्षणाच्या व्यापारीकरणाविरोधात आवाज उठवण्याच्या उद्देशाने विद्यार्थ्यांच्या सुमारे 60 संघटना आणि काही विद्यापीठांचे निवडून आलेले पदाधिकारीही संपामध्ये सहभागी होणार आहेत. 175 पेक्षा जास्त शेतकरी आणि कृषी कामगार संघटनांदेखील कामगारांच्या मागण्यांना पाठिंबा देणार

महत्त्वाचे म्हणजे रेल्वे व अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आले आहे. कामगार कृती समितीचे सहनिमंत्रक विश्वास उटगी यांच्याकडून ही माहिती देण्यात आली आहे. या संपामध्ये राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचाही समावेश असणार आहे. शाळा, महाविद्यालयांनी या संपामध्ये सहभाग घेतलेला नाही. मात्र विविध कामगार संघटनांचे शाळा, महाविद्यालयांतील प्रतिनिधी काळ्या फिती लावून निषेध नोंदवणार असल्याचे वृत्त आहे. छात्रभारतीसारख्या संघटनांनी कामगार संघटनांच्या या संपाला पाठिंबा म्हणून विद्यापीठ बंदची हाकही दिली आहे. स्कूल बससेवा चालू ठेवायच्या की नाही याचा निर्णय त्याच दिवशी घेऊ, असे स्कूल बस असोसिएशनने सांगितले आहे.