आझम कॅम्पस मध्ये वाचन प्रेरणा दिवस साजरा
पुणे : परवेज शेख
महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या शाळा आणि महाविद्यालयांमध्ये माजी राष्ट्रपती डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनानिमित्त वाचन प्रेरणा दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
संस्थेच्या इंग्लिश मिडीयम स्कुल अँड ज्युनियर कॉलेज मध्ये मुख्याध्यापक रुमाना शेख यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी वर्तमानपत्रे,शैक्षणिक नियतकालिके आणि पुस्तकांचे वाचन केले.