मुंबई : अमेरिका आणि चीनमधल्या वाढत्या व्यापार तणावामुळे सोनं आज खूपच महाग झालंय. गुंतवणूकदारांचा सोन्यामधला रस वाढल्यानं सोमवारी ( 5 ऑगस्ट ) सोनं 800 रुपयांनी वाढलं आणि सोनं 36,970 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोचलं. चांदीतही मजबूत वाढ झालीय. चांदी 1000 रुपयांनी वाढून 43,100 रुपये किलोवर पोचलीय. आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं 1,459.46 डाॅलर झालंय.
सोन्याची किंमत वाढण्यामागे कारण
मे 2013नंतर सोन्याचा हा सर्वोच्च स्तर आहे. याचं कारण अमेरिका-चीनमधला वाढता तणाव आणि स्थानिक व्यापाऱ्यांची मागणी आहे. अमेरिकेनं गेल्या आठवड्यात चीनमधून आयात होणाऱ्या 300 अब्ज डाॅलर किमतीच्या सामानावर 10 टक्के अतिरिक्त दाम लावण्याची घोषणा केली. चीनचे राष्ट्रपती शी चिनफिंग व्यापार सामंजस्यावर अयशस्वी झाले तर हा दर वाढू शकतो. शिवाय डाॅलरच्या तुलनेत रुपया घसरलाय. त्यामुळेही सोनं कडाडलं.
सोन्याचा नवा दर
दिल्लीत 99.9 टक्के सोनं 36,970 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 99.5 टक्के शुद्ध सोनं 36,800 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. गिन्नी सोन्याची किंमत 100 रुपयांनी वाढून 27,600 रुपये प्रति 8 ग्रॅम राहिलीय
चांदीही चमकली
चांदी 1000 रुपयांनी वाढून 43,100 रुपये किलोवर पोचलीय. साप्ताहिक डिलिव्हरीची किंमत 1,039 रुपये वाढलीय. ती आता 42,403 रुपये किलो झालीय. चांदीच्या नाण्याची किंमत लिवाल 85,000 रुपये आणि बिकवाल 86,000 रुपये प्रति शेकड्यावर स्थिर राहिलीय.
पुढील काही महिन्यात म्हणजेच दिवाळीपर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याचा दर 1 हजार 500 डॉलरवर पोहोचण्याची शक्यता आहे. त्याचा थेट परिणाम भारतीय बाजारपेठेतील दरांवर होऊ शकतो. त्यामुळे देशातील सोन्याचा दर दिवाळीपर्यंत 36 हजारच्या पुढे जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर चांदीचे दर 42 हजारपर्यंत जाण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याच्या दरावर फेडरल रिझर्व्ह बँकेचे व्याज दर, अमेरिका आणि इराणमध्ये सुरू असलेला तणाव या सर्व गोष्टींचा परिणाम होऊ शकतो असं जाणकारांचं मत आहे.