आणखी एका दाक्षिणात्य चित्रपटांचे हिंदी रिमेक; मनीषा कोईराला महत्त्वाच्या भूमिकेत

आणखी एका  दाक्षिणात्य चित्रपटांचे हिंदी रिमेक;  मनीषा कोईराला  महत्त्वाच्या भूमिकेत
- Advertisement -


मुंबई: गेल्या काही वर्षांमध्ये अनेक दाक्षिणात्य चित्रपटांचे हिंदी रिमेक आले. या यादीत आता ‘आला वैकुंठापुरमल्लू’ चित्रपटाच्या रिमेकची भर पडणार आहे. मूळ चित्रपटात अभिनेत्री तब्बूनं साकारलेली भूमिका, हिंदी आवृत्तीत अभिनेत्री मनीषा कोईराला साकारणार असल्याचं कळतंय.

या चित्रपटात कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत आहे. सुरुवातीला निर्मात्यांना चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्येही तब्बूच हवी होती; पण तब्बू आणि कार्तिक आर्यन हे दोघं ‘भुलभुल्लैया २’ या आगामी चित्रपटात एकत्र दिसणार आहेत; त्यामुळे निर्मात्यांनी हिंदी रिमकेमध्ये मनीषाला घेतलं आहे.

५३ सर्जरीवरही वरचढ ठरला योग, कंगना रणौतने सांगितली अ‍ॅसिड अटॅकनंतरची बहिणीची अवस्था

मनीषानं कॅन्सर या आजावार मात करत सेकंड इनिंग सुरू केली. त्यानंतर तिनं ‘डियर माया’सारखे सिनेमे केले. हा चित्रपट फारशी चांगली कामगिरी करू शकला नाही; मात्र तिच्या अभिनयाचं कौतुक झालं. त्यानंतर ती ‘संजू’ या चित्रपटात दिसली. त्यामध्ये ज्येष्ठ अभिनेत्री नर्गीस दत्त यांची भूमिका साकारली. भूमिकेला देण्यात आलेला नर्गीस यांचा लूक आणि मनीषाच्या अभिनयाचं कौतुक झालं. त्यानंतर तिच्याकडे चरित्र भूमिकांसाठी विचारणा होत आहे. नव्वदच्या दशकात चर्चेत राहिलेली ही अभिनेत्री आगामी काळात भूमिकांची निवड कशी करते, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
बाबो! योगा दिनाच्या शुभेच्छा देताना बेबोनं शेअर केला बिकीनीतला फोटो





Source link

- Advertisement -