Home शहरे मुंबई …आणि एका एसएमएसने बालविवाह थांबला

…आणि एका एसएमएसने बालविवाह थांबला

0
…आणि एका एसएमएसने बालविवाह थांबला

[ad_1]

मुंबई : करोना संसर्गाने फटका बसलेल्या जिल्ह्यात अल्पवयीन मुलींचे विवाह लावून त्यातून पैसे कमावण्याचा उद्योग सुरू झाला आहे. पोलिसांसह सरकारी यंत्रणा करोना उपाययोजना आणि संचारबंदीच्या अंमलबजावणीमध्ये गुंतलेली असताना आणि मदतीची कुठूनही आशा नसताना एका अल्पवयीन मुलीने दाखवलेल्या असाधारण धाडसामुळे रोखला गेला आहे.

बीड जिल्ह्यातील शिरुर कासार या ऊसतोड कामगार बहुसंख्येने असलेल्या तालुक्यात बालविवाहांची समस्या मोठी आहे. १७ वर्षांची सरिता (नाव बदलले आहे.) या तालुक्यातील एका दुर्गम वाडीत तिच्या आईसह मामाच्या आधाराने राहते. तिला वडील नाहीत. वक्तृत्व स्पर्धा आणि पथनाट्यांमध्ये जिल्हापाततळीवर चमकलेली सरिता दहावीत उत्तम गुण मिळवून सध्या मानूरच्या कनिष्ठ महाविद्यालयात अकरावीत शिकत आहे. विधी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊन वकील व्हायचे तिचे स्वप्न आहे.

लॉकडाउनमुळे २० लोकांच्या उपस्थितीची अट असल्याने लग्न स्वस्तात होते आणि पुष्कळदा मुलाकडच्या लोकांकडूनच काही रक्कम पदरात पडते. सरिताच्या मामांनीही तिच्यासाठी पैठणहून स्थळ आणले आणि लग्नाची तयारी सुरू केली. सरिता आणि आईने त्याला विरोध केला, पण त्यांना गप्प बसवले गेले.

शाळेच्या दिवसांत ” आणि यूएनएफपीएच्या बालविवाह रोखून मुलींना स्वयंपूर्ण करण्याच्या एका प्रकल्पामध्ये सरिता सक्रिय होती. बहिणीचा बालविवाह झाल्याने तिच्या आयुष्याची झालेली फरफट ती बघत होती. हीच वेळ कधी आपल्यावर येईल, असे मात्र तिला वाटले नव्हते. हट्ट करून, रडूनही मामाला पाझर फुटत नाही म्हटल्यावर तिने ‘लेक लाडकी अभियाना’च्या अॅड. वर्षा देशपांडे यांना कसाबसा चोरून मेसेज पाठवला. त्यानंतर चक्रे हलली. अभियानाकडून तातडीने जिल्हा प्रशासन, जिल्हा बाल संरक्षण समिती, जिल्हाधिकारी, पोलिसांशी संपर्क साधला. जिल्हा पोलिस अधीक्षकांनी या घटनेची गंभीर दखल घेतली. १९०८ या चाइल्डलाइनवरही तक्रार नोंदवली.

४ एप्रिलला चाइल्डलाइनकडून वाडीच्या ग्रामसेवकांना तातडीने पत्र गेले. बुधवारी, ५ एप्रिल रोजी महिला पोलिसासह सरिता आणि तिच्या पालकांना बीडला बालकल्याण समितीसमोर उपस्थित राहण्यास सांगून हा विवाह रोखला गेला. लॉकडाउन संपताच तिचे पुढील शिक्षण आणि पुनर्वसनाची जबाबदारी लेक लाडकी अभियान उचलणार आहे.

लॉकडाउनच्या काळात बालविवाह प्रचंड संख्येने होत आहेत. ८ मे रोजीही याच तालुक्यातील एका गावात आणखी एक बालविवाह होणार असून तो थांबवण्यासाठी धडपड सुरू आहे. प्रशासनाने बालविवाह रोखण्यासाठी तातडीने प्रयत्न करणे अत्यावश्यक आहे. अन्यथा गेले काही वर्षे सरकार आणि स्वयंसेवी संस्थांनी केलेले प्रयत्न फोल ठरण्याची भीती आहे.

– अॅड. वर्षा देशपांडे, लेक लाडकी अभियान

[ad_2]

Source link