आणि तरुणाने घेतली थेट सिंहासमोरच उडी

- Advertisement -

आणि तरुणाने घेतली थेट सिंहासमोरच उडी

भूषण गरुड :दिल्लीतील प्राणी संग्रहालयात अंगावर शहारे आणणारी घटना घडली आणि सर्वांना चांगलीच धडकी भरली होती. 

झाले असे कि, सिंह बंदिस्त असलेल्या एका मोठ्या जाळीत, एका तरुणाने थेट उडी घेतली. सिंह याचा फडशा पाडणार असे अनेकांना वाटले. मात्र सुदैवाने तसे काही झाले नाही.

जवळपास 5 मिनीटांपेक्षा जास्त काळ हा तरूण मोकळ्या असेलल्या सिंहाच्या तावडीत होता. विशेष म्हणजे या दरम्यान त्याला साधे खरचटले देखील नाही. रेहान खान (बिहार, वय 28) असे या तरूणाचे नाव असून तो मानसिक रोगी असल्याची माहिती समोर येत आहे.

घटनेची माहिती मिळताच प्राणीसंग्रहालयातील सुरक्षा रक्षक सिंहाच्या पिंजऱ्यात शिरले व त्यांनी या तरूणास सिंहाच्या तावडीतून सुखरूप बाहेर काढले. हे पाहिल्यानंतर उपस्थित नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. यानंतर या तरूणास पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले असून त्याची विचारपूस सुरु आहे

- Advertisement -