Home बातम्या राजकारण …आणि मी बाळासाहेबांना पत्र दिलं, राजीनामा देतोय – नारायण राणे

…आणि मी बाळासाहेबांना पत्र दिलं, राजीनामा देतोय – नारायण राणे

0

मुंबई : ‘मी 14 वर्षांचा असताना शिवसैनिक झालो. त्यावेळी फक्त 16 वर्षांचा असलेल्यांनाच सदस्यपद मिळत होते. मग माझ्यापेक्षा मोठ्या मुलाला दोन रुपये देऊन माझ्या नावाने नोंदणी करायला सांगितली. आज ते तुम्हाला चुकीचे वाटत असेल. पण शिवसेनेत येण्यासाठी ते करावे लागले. उद्धव ठाकरेंसारख्या आयत्या बिळावर नागोब असलेल्या माणसाला हे समजणार नाही’, असे झंझावाती विधान माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आपल्या आत्मकथनपर पुस्तक प्रकाशनाच्या वेळी केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते ‘झंझावात’ या पुस्तकाचं प्रकाशन झालं. त्यावेळी ते बोलत होते.

शिवसेना देशात वाढवायची ठरलं आणि मला जम्मू काश्मीर दिलं, त्यावेळी मात्र मी म्हणालो आम्ही फक्त गोळ्या खाऊन मरायचं का? त्यावेळी बाळासाहेबांना पत्र दिलं की मी राजीनामा देतोय. दुसऱ्या दिवशी सकाळी मला बाळासाहेबांचा फोन आला आणि विचार करायला सांगितलं. पण मी परत गेलो नाही. असे मत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केले. राणे पुढे म्हणाले की, उद्धव म्हणाला जर नारायण राणे परत येणार असेल तर मी घर सोडणार या धमकीमुळेही बाळासाहेबांनी मला थांबण्याचा आग्रह केला नाही.