Home बातम्या आंतरराष्ट्रीय आता अधिक लोकांसोबत करता येईल व्हॉट्सअ‍ॅप व्हिडीओ कॉन्फरन्स कॉल

आता अधिक लोकांसोबत करता येईल व्हॉट्सअ‍ॅप व्हिडीओ कॉन्फरन्स कॉल

0

व्हॉट्सअ‍ॅप लवकरच आपल्या वापरकर्त्यांसाठी मोठे अपग्रेड घेऊन येत आहे. आतापर्यंत एकाच वेळी चार लोकांशी व्हॉट्सअ‍ॅप व्हिडीओ कॉल द्वारे संवाद जाता येत होता. मात्र ही संख्या आता वाढणार आहे. काही दिवसांपूर्वी ‘झूम ‘ अॅपची लोकप्रियता खूप वाढली होती. हे पाहता फेसबूकने आपल्या इन्स्टंट मेसेजिंग आणि कॉलिंग अॅपमध्ये हे बदल करु शकते. पुढील काही आठवड्यात व्हॉट्सअ‍ॅपमध्ये वापरकर्त्यांना मोठे बदल दिसू शकतात. यामुळे स्काइप आणि झूम सारख्या व्हिडीओ कॉलिंग अॅपला आवाहन मिळू शकते.

WABetainfo दिलेल्या माहितीनुसार, लवकरच व्हॉट्सअ‍ॅप व्हिडीओ कॉलिंग मध्ये एकाच वेळी अधिक लोकांशी संवाद साधता येणार आहे. व्हॉट्सअॅपच्या नवीन बीटा अपडेटच्या कोडमध्ये हा खुलासा झाला आहे. हा कोड प्रथम बीओएस अद्यतनासह iOS वर आणला गेला. नंतर हा कोड अँड्रॉइडसाठी आणलेल्या बीटा अद्यतनामध्ये देखील पाहण्यात आला आहे.

व्हॉट्सअॅपच्या नवीन बीटामध्ये व्हिडिओ कॉल दरम्यान एक नवीन हेडर दिसते. ज्यामध्ये असे लिहिले आहे की, आपले कनेक्शन एंड-टू-एंड एन्क्रिप्शनद्वारे सुरक्षित केले गेले आहे. याशिवाय नवीन बीटा अपडेट मध्ये हिडेन कोड स्टिंग देण्यात आले आहे. हा नवीन स्टिंग कोड व्हॉट्सअॅप व्हिडिओकॉल द्वारे आपण किती लोकांशी जोडले गेलो आहोत हे सांगतो. मात्र या नवीन कोडनुसार आपण एकाच वेळी किती लोकांशी जोडले जाऊ हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. हा आकडा 10 ते 99 च्या मध्ये असू शकतो. दरम्यान, व्हॉट्सअॅपचे हे फीचर्स कधी अपडेट होणार याबाबत अद्याप कळू शकलेले नाही आहे.