आता तिसरं लग्न होणार का? श्वेता तिवारीचा ‘तो’ व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

आता तिसरं लग्न होणार का? श्वेता तिवारीचा ‘तो’ व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
- Advertisement -


हायलाइट्स:

  • श्वेता तिवारी केपटाऊनमध्ये करतेय ‘खतरों के खिलाडी ११’चं शूटिंग
  • खासगी आयुष्यामुळे नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते श्वेता तिवारी
  • इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओमुळे श्वेता होतेय सोशल मीडियावर ट्रोल

मुंबई: सध्या सोशल मीडियावर ‘खतरों के खिलाडी ११‘ची जोरदार चर्चा सुरू आहे. या शोचं शूटिंग यंदा केपटाऊनमध्ये होत आहे. सध्या या शोमधील सर्वच स्पर्धक त्यांच्या सोशल मीडिया हॅन्डलवर तिथले फोटो आणि मजेदार व्हिडीओ शेअर करताना दिसत आहेत. यापैकीच एक स्पर्धक टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी सध्या सोशल मीडियावर अधिकच सक्रिय झाली आहे. श्वेता अनेकदा दुसऱ्या स्पर्धकांसोबत तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसत आहे. पण अशातच एका व्हिडीओमुळे तिला सोशल मीडियावर ट्रोल व्हावं लागलं आहे.

श्वेता तिवारीनं तिच्या इन्स्टाग्रामवर नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात ती स्पर्धक आणि अभिनेता विशाल आदित्य सिंहसोबत डान्स करताना दिसत आहे. श्वेतानं या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, ‘हाहा, हा आहे आमचा हॅप्पी डान्स, तर प्रश्न असा आहे की आम्ही खूश का आहोत. कोणी अंदाज लावू शकेल का?’ या व्हिडीओमध्ये श्वेता आणि विशाल आपल्याच अंदाजात डान्स करताना दिसत आहेत. त्यांचा हा व्हिडीओ खूपच मजेदार आहे. काही युझर्सना हा व्हिडीओ आवडला आहे तर काहींनी मात्र श्वेताला यावरून ट्रोल केलं आहे.
अभिनव कोहलीने फिरवला श्वेता तिवारीचा डाव, शेअर केले नवे CCTV फुटेज

श्वेताच्या या व्हिडीओवर ट्रोल करताना एका युझरनं लिहिलं, ‘तिसरं लग्न होणार आहे का?’ तर दुसऱ्या एका युझरनं लिहिलं, ‘२ लग्न मोडल्यानंतर तिसऱ्याच व्यक्तीसोबत एवढं आनंदी असलेली व्यक्ती मी पहिल्यांदाच पाहत आहे. तू नक्कीच श्वेता तिवारी आहेस ना की रिअल प्रेरणा बासू.?’ अशाप्रकारे अनेक युझर्स श्वेताच्या खासगी आयुष्यावरून तिला ट्रोल करताना दिसत आहेत.

AssignmentImage-887710096-1624166509

‘तो मुलासाठी एक पैसा खर्च करत नाही’ श्वेता तिवारीचा अभिनव कोहलीवर पलटवार


अशाप्रकारे ट्रोलिंग होणं हे श्वेतासाठी नवीन नाही. या आधीही अनेकदा श्वेताला सोशल मीडियावर तिच्या खासगी आयुष्यातील वादांमुळे ट्रोल केलं गेलं आहे. श्वेताची दोन लग्न झाली असून दोन्ही लग्न काही काळातच मोडली. मागच्या काही काळापासून तिचा दुसरा पती अभिनव कोहलीसोबत तिचे वाद सुरू आहेत. ज्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा झाली होती.
अभिनेत्री अनुष्का सेनला करोनाची लागण, ‘खतरों के खिलाडी ११’च्या मेकर्सची चिंता वाढली





Source link

- Advertisement -